गोवा: परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विध्यार्थांना घेतले ताब्यात

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

दहावी बारावीची परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी आज विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानासमोर निदर्शने केली

पणजी: दहावी बारावीची परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी आज विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या शासकीय निवासस्थानासमोर निदर्शने केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचाही प्रयत्न केला. यापूर्वी मडगाव, म्हापसा व गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली होती. विद्यार्थी शक्य असेल तर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घ्या अशी मागणी करत आहेत. निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Students detained for demanding postponement of exams)

सुनील अरोरा होणार गोव्याचे नवे राज्यपाल? वाचा सविस्तर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशभरातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय  घेतला होता.  केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोरखियाल निशंक यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली होती. दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आली आहे. दहावीचे निकाल राज्य शिक्षण मंडळाने विकसित केलेल्या वस्तुनिष्ठ निकषांच्या आधारे तयार करण्यात येतील. तर बारावीच्या परीक्षा 1 जून पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.  1 जून रोजी मंडळामार्फत कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन इयत्ता 12 वीच्या परीक्षांबाबत पुढील निर्णय घेऊ, असेही निशंक यांनी म्हटले आहे. मात्र  राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत दहावी आणि 12 वीच्या राज्य बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा कोणताही विचार केलेला नाही, असे सांगितले होते.

संबंधित बातम्या