What Next After 10th: विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीचाही विचार व्हावा !

तज्ज्ञांचे मत : अकरावीसाठी प्रवेश सुरू : विज्ञान-व्यावसायिकतेकडे विद्यार्थ्यांचा कल
What to do after 10th, 12th
What to do after 10th, 12th Dainik Gomantak

What Next After 10th पैसा मिळवण्यापेक्षा ज्ञान मिळवणे, हे शिक्षणाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. यात विद्यार्थी केंद्रबिंदू असतो. मात्र, महत्त्वाकांक्षी पालकांच्या हट्टी धोरणामुळे विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडी आणि कला-गुणांकडे दुर्लक्ष होत असून त्याचा अंतिम परिणाम ज्ञानार्जनावर होत आहे.

यासाठीच अकरावीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्या आवडी-निवडीचा विचार व्हावा, असे मत शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

What to do after 10th, 12th
KTCL Bus App: कदंब महामंडळ लवकरच लॉंच करणार त्यांचे सुधारित ॲप; प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

इयत्ता दहावी शनिवारी निकाल जाहीर झाला. यात19288 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून काही विद्यार्थ्यांना एटीकेटी मिळाली आहे. या आधारे ते अकरावीत प्रवेश मिळवू शकतात. उद्या, सोमवारपासून माहिती पुस्तिका मिळवून अकरावीत प्रवेशही घेता येणार आहे.

विद्यार्थ्यांचा कल जाणून घ्या! : ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ कालिदास मराठे म्हणाले की, शिक्षण हे गुणवत्तेचा शोध घेणारे असावे. मात्र, पालकांच्या आवडी-निवडीलाच जास्त महत्त्व दिले जाते.

साहजिकच पाल्याच्या शिक्षणावर चांगला आणि वाईट परिणाम होतो. म्हणून अनेक मुले संबंधित विद्या शाखा सोडून दुसरी विद्या शाखा निवडतात. त्यामुळे विद्यार्थ्याचा कल जाणून घ्यावा.

What to do after 10th, 12th
Power outage: नळ कोरडे, वीज गुल; लोक गेले निसर्गाच्या सान्निध्यात पिकनिकला

नव्या विद्या शाखांचा अवलंब करा!

शिक्षण तज्ज्ञ पांडुरंग नाडकर्णी म्हणाले, पूर्वी जास्त पैसे मिळवण्यासाठी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राची निवड केली जायची.

आता शिक्षणाचा हा फंडा मागे पडत असून नाट्य, साहित्य, पेंटींग, डिझाईन, आदरातिथ्य शाखाही तितक्याच महत्त्वाच्या बनल्या असून त्या आपल्या आवडी-निवडीसह उत्तम पैसे मिळवून देतात. त्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांनी नव्या विद्या शाखांचाही विचार करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com