विद्यार्थ्यांनी स्वप्ने जीवंत ठेवून जीवनाची वाटचाल करावी: मंत्री मायकल लोबो

कोवीड महामारीच्या (Covid 19) काळात स्थानिक जरुरतमंद लोकांना वेळोवेळी कडधान्याचे वाटप करुन समर्थन संघटणेच्या पदाधिकार्यानी लोकांचा दुवा घेतलेला आहे.
Minister Michael Lobo
Minister Michael LoboDainik Gomantak

शालांत परिक्षेत भरघोस यश प्राप्त केलेल्या शिवोली (Siolim) पंचक्रोशीतील होतकरु विद्यार्थी तसेच जेष्ठ शिक्षकांचा जाहीर सन्मान करून समर्थन संघटनेने समाजात एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. कोवीड महामारीच्या (Covid 19) काळात स्थानिक जरुरतमंद लोकांना वेळोवेळी  कडधान्याचे वाटप करुन  समर्थन संघटणेच्या पदाधिकार्यानी लोकांचा दुवा घेतलेला आहे.

अशाप्रकारे जनतेच्या सुख दुखात वेळोवेळी सहभागी होणाऱ्या  समर्थन संघटणेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून लोकांनी स्वामी समर्थांच्या साक्षात्काराचा अनुभव प्राप्त करुन घेण्याचे आवाहन कळंगुटचे आमदार तथा राज्याचे ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी शिवोलीत केले. याभागातील स्वामी समर्थ मठाच्या सभागृहात स्थानिक समर्थन संघटणेकडून आयोजित पंचक्रोशीतील शालांत परिक्षेत विशेष श्रेणीत स्थान प्राप्त केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा जाहीर सन्मान केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने मंत्री मायकल लोबो  बोलत होते.

Minister Michael Lobo
Goa Police: नाट्यमय गुन्ह्याचा पोलिसांकडून पर्दाफाश

यावेळी व्यासपीठावर स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष तथा संस्थापक निलेश वेर्णेकर,  सामाजिक कार्यकर्ते रुडोल्फ फर्नाडीस, म्हापसा नगरपालिकेच्या नगरसेवक डॉ. नुतन बिचोलकर, शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर, ओशेलच्या सरपंच वंदना नार्वेकर, उप-सरपंच मंगेश चोडणकर,  सडयेचे सरपंच निलेश वायंगणकर, आंसगांवचे सरपंच हनुमंत नाईक, उप-सरपंच कार्तीक केळकर, वेर्ला -काणकाच्या सरपंच अनीता कोरगांवकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे माजी अध्यक्ष वासुदेव कोरगांवकर, हणजुण-कायसुवचे सरपंच पेट्रीक सावियो आल्मेदा, शिवोलीतील वुमन्स पतसंस्थेच्या चेअरमन पल्लवी दाभोलकर, समर्थन संघटणेचे अध्यक्ष प्रेमानंद आरोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Minister Michael Lobo
Goa Container ship service: 15 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड!

दरम्यान, प्रत्येक विद्यार्थ्याने डोळ्यांसमोर आपल्या भविष्याचे स्वप्न बाळगुन जीवनाची वाटचाल करतांनाच स्वताची इतरांशी तुलना न करतां परमेश्वराने  दिलेल्या कला गुणांचा यथायोग्य वापर करुन यशस्वी होण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी त्यांच्याहस्ते एकुण चौतीस विद्यार्थी विद्यार्थीनींचा जाहीर गौरव करण्यात आला. यावेळी ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मंत्री लोबो यांनी प्रत्येकासाठी पाच हजारांची मदत जाहीर केली. यावेळी  जेष्ठ निव्रुत्त शिक्षक रमेश हरिश्चंद्र कोरगांवकर,  सिरील रेमेडियस , श्रीमती बर्था फोन्सेका कदम, तसेच रविंद्र शिवा चोडणकर यांचा  सामाजिक कार्यकर्ते रुडोल्फ फर्नाडीस यांच्या हस्ते शाल श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Minister Michael Lobo
Goa Politics: माजी मंत्री महादेव नाईक यांचा 'आप'मध्ये प्रवेश

दरम्यान, समर्थन संघटणेचे संस्थापक निलेश वेर्णेकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या स्थापनेपासून आतापर्यंत चाललेल्या सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. म्हापसाच्या नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर, हणजुण कायसुवचे सरपंच पेट्रीक सावियो आल्मेदा, आंसगांवचे सरपंच हनुमंत नाईक, सडयेचे सरपंच निलेश वायंगणकर, ओशेलचे उप-सरपंच मंगेश चोडणकर यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. सुत्रसंचालन सुदेश किनळेकर यांनी तर आभार प्रदर्शन संघटणेचे सचीव यदुवीर सामेपुरुषक यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच पालकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. ....

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com