Mahadayi Water Dispute : म्हादईच्या बचावासाठी आता शाळकरी मुलांचाही एल्गार

साखळीतील पालिका मैदानावर 16 जानेवारीला गोव्याच्या विविध शाळेतील विद्यार्थी जमणार आहेत.
Goa School
Goa SchoolDainik Gomantak

म्हादईप्रश्नी गोव्यात सध्या रान पेटलेलं असतानाच आता शाळकरी विद्यार्थ्यांनी म्हादईच्या रक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मेळावा साखळीमध्ये होणार आहे. येत्या 16 जानेवारी रोजी साखळीतील पालिका मैदानावर हे सर्व शाळकरी विद्यार्थी एकत्र येणार असून म्हादई नदीच्या रक्षणासाठी प्रतिज्ञा करणार आहेत. सेव्ह म्हादई सेव्ह गोवा म्हणजेच म्हादई वाचवा गोवा वाचवा असा नारा देत विद्यार्थी एकत्र येणार आहेत.

दुसरीकडे साखळीतील ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’च्या म्हादईबचाव सभेला काणकोणमधून दोनशे नागरिक उपस्थित राहणार आहेत. या संदर्भात काणकोणमधील चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सभागृहात बोलाविलेल्या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बस गाड्यांची व्यवस्था

’या साखळीतील म्हादई बाचावच्या सभेला काणकोणहून सहभागी होण्यासाठी तीन बस गाड्यांची व्यवस्था केली आहे.

Goa School
Mahadayi Water Dispute: गृहमंत्र्यांनंतर जलशक्ती मंत्र्यांची भेट, शिष्टमंडळाला मिळाले मोठे आश्वासन

म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटकला दिलेल्या ‘डीपीआर’ची मंजुरी रद्द करावी आणि तातडीने जल व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करावी, या मागणीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बुधवारी दिल्लीत भेट घेतली. ‘म्‍हादई जलवाटप अधिकारीणी स्‍थापन करण्‍याबाबत आपण लक्ष घालू’, असे शहा यांनी गोव्‍याच्‍या शिष्‍टमंडळाला सांगितले; तरंतु ‘डीपीआर’ आक्षेपाविषयी कोणतेही स्पष्ट आश्वासन दिलेले नाही. दरम्यान, त्यानंतर या शिष्टमंडळाने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांची भेट घेतली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com