Goa Agriculture: विद्यार्थ्यांनी घेतले शेतीचे धडे

सह्याद्रीच्या डोंगरावर असलेल्या साट्रे गावाला भेट देऊन मुलांनी अनेक प्रकारच्या नैसर्गिक संपदेची माहिती जाणून घेतली.
Goa Agriculture|Farm
Goa Agriculture|FarmDainik Gomanatk

Goa Agriculture: नियमित शिक्षणासह आपल्या अवतीभोवती असणाऱ्या विविध क्षेत्रांचा अभ्यास व्हावा, या हेतूने आंबेडे-नगरगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेतील मुलांना प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन शेती कशी करतात, याचे धडे देण्यात आले.

सह्याद्रीच्या डोंगरावर असलेल्या साट्रे गावाला भेट देऊन मुलांनी अनेक प्रकारच्या नैसर्गिक संपदेची माहिती जाणून घेतली. अभ्यासाबरोबर कृषी क्षेत्राचे ज्ञान आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात घेऊन शिक्षण खात्यातर्फे प्राथमिक स्तरावर वेगवेगळे उपक्रम राबवून मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यात येत आहे.

साट्रे येथील युवा शेतकरी श्‍याम गावकर यांच्या स्ट्रॉबेरी बागेत मुलांनी फळझाडांची पाहणी केली. साट्रे हा गाव आता प्रति महाबळेश्वर म्हणून नावारूपास येत आहे. येथील थंड वातावरण स्ट्रॉबेरी पिकास पूरक असल्याचे श्‍याम गावकर यांनी सांगितले.

मुलांनी स्ट्रॉबेरी बागेत फिरून पाहणी केली. श्याम यांनी मुलांना आपल्या बागेतील विविध भाज्या व इतर झाडांची माहिती दिली. झाडांची मशागत कशी केली जाते, हेही सांगितले.

शेतकरी श्याम यांनी शेतात स्ट्रॉबेरीसह मुळा, लाल भाजी, पडवळ, काकडी व इतर भाज्यांची लागवड केली आहे. यावेळी मुलांसोबत शिक्षिका नयन बर्वे, चित्रा भावे उपस्थित होत्या. श्याम गावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल चित्रा भावे यांनी आभार मानले.

Goa Agriculture|Farm
Goa Road Construction: फोंड्यात मिशन रस्ते चकाचक जोरात!

म्हादईच्या पाण्यावर फुलते शेती

यावेळी श्याम गावकर म्हणाले, सत्तरी हा कृषिप्रधान गाव आहे. आमच्या गावात म्हादई नदीमुळे शेती बहरली आहे. त्यामुळे सर्वांनी म्हादईचे रक्षण केले पाहिजे. या नदीवर आम्ही शेतकरी अवलंबून आहोत.

जर म्हादई नदीचे पाणी कमी झाले तर येणाऱ्या दिवसांत शेतकऱ्यांवर संकट येणार आहे. आज मुलांना कृषी क्षेत्राकडे वळवले पाहिजे. कारण शेतीमुळे स्वयंरोजगार प्राप्त होऊन आर्थिक पाठबळ मिळेल. कृषी खात्याच्या अनेक योजना आहेत. त्याचा फायदा इच्छुक शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com