Goa Board: दहावीतील सर्वांनाच पास केले, तर अकरावीत प्रवेश कसा?

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 एप्रिल 2021

यंदा दहावीच्या परीक्षेस बसण्यासाठी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केले जाऊ शकते.

पणजी: यंदा दहावीच्या परीक्षेस बसण्यासाठी गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण केले जाऊ शकते. मंडळाने तसा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून तो सरकारमध्ये उच्च पातळीवर विचाराधीन आहे.

देशात अनेक मंडळानी दहावीची परीक्षा रद्द केली आहे. त्या परीक्षेसाठी बसू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय अनेक राज्यांतील मंडळांनी घेतला आहे. काही राज्यांच्या मंत्रिमंडळात तसा निर्णय घेतला गेला आहे. त्याच धर्तीवर राज्यातही दहावीसाठी बसू इच्छिणाऱ्या 24 हजार विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव मंडळाने तयार केला आहे. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारच्या विनंतीवरून घेतला गेल्यानंतर मंडळाने हा नवा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे. दहावी इयत्तेच्‍या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन अशा संभ्रमात होत्‍या. मात्र, कोरोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता शिक्षण मंडळाने परीक्षा शुल्‍क भरलेल्‍यांना पास करण्‍याचा निर्णय घ्‍यावा, असे प्रस्‍तावात म्‍हटले आहे.

गोव्यातून कोकणात जाणाऱ्या अप-डाऊनच्या 8 रेल्वेगाड्या रद्द;  प्रवाशांचा हिरमोड 

मार्गदर्शक तत्‍वे तयार झाल्‍यावर गुंता सुटणार
मिळालेल्या माहितीनुसार दहावीतील सर्वांनाच उत्तीर्ण केले, तर अकरावीतील प्रवेशाचा गुंता कसा सोडवावा, हा प्रश्न चर्चेला आला आहे. सर्वांनीच विज्ञान विद्या शाखेच्या प्रवेशाची मागणी केली, तर तो प्रश्न कसा सोडवावा यावर विचार करण्यात आला आहे. सीबीएसई म्हणजेच केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ हे केंद्रिय मंडळ दहावीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले, तर अकरावीत विविध विद्या शाखांना प्रवेश देताना कोणते निकष लावावेत, याविषयी मार्गदर्शक तत्वे तयार करत आहे. ती मार्गदर्शकत तत्वे प्रत्येक राज्यातील शिक्षण मंडळांना पाठवली जाणार आहेत.

गोवा: लाॅकडाऊनमधून उद्योगांना वगळण्याच्या निर्णयाचे जीएसआयएकडून स्वागत 

...तर उत्तीर्ण निर्णय?
परीक्षा शुल्‍क भरलेल्‍यांना पास करण्‍याचा निर्णय झाला, तर अकरावीत प्रवेश कसा? प्रश्‍‍न निर्माण होणार आहे. सर्वांनाच एकाच शाखेत कसा प्रवेश देणार, हा गुंता सुटला की दहावीतील विद्यार्थ्यांना सरसकटपणे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती मिळाली आहे. या संवेदनशील विषयावर सध्या मंडळ व सरकार यांच्या पातळीवर उघडपणे बोलण्याची कोणाचीच तयारी नाही. देशभरातील मंडळांनी दहावीची परीक्षा रद्द केली असताना राज्यात ती घेण्याचा हट्ट करता येणार नाही, या निर्णयाप्रत मंडळ आले आहे. त्यामुळे त्यांनी मान्यतेसाठी हा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. त्यासाठी आवश्यकता असल्यास मंत्रिमंडळ निर्णय घेतला जाणार आहे. मात्र येत्या काही दिवसांत हा प्रश्न निकाली काढला जाण्याची शक्यता आहे.

असा घातला कोरोनाने गोव्यात विळखा म्हणून मुख्यंत्र्यांना घ्यावा लागला लॉकडाउनचा निर्णय 

संबंधित बातम्या