'नीट’ न दिलेल्या विद्यार्थ्यांना उद्या पुन्हा परीक्षा देण्याची संधी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

१४ ऑक्टोबरला परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी देतानाच या परीक्षेचे निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर होतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

नवी दिल्ली- कोरोना संसर्ग झाल्यामुळे किंवा प्रतिबंधित क्षेत्रात रहात असल्यामुळे यंदाची ‘नीट’ परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा १४ ऑक्टोबरला देण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. 

सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे याबाबत आज सुनावणी झाली. १४ ऑक्टोबरला परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना परवानगी देतानाच या परीक्षेचे निकाल १६ ऑक्टोबरला जाहीर होतील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 

संबंधित बातम्या