पर्यावरण विध्वंसाचा सखोल अभ्यास करा

वार्ताहर
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

एलिना साल्ढाणा ः जैवविविधता संवर्धन नोंदणी वैधतेचे सादरीकरण

दाबोळी: गावातील जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक पुढे येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. मात्र विकास करताना पर्यावरणाचा विध्वंस झाला याचा सखोल अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याची गरज कुठ्ठाळीच्या आमदार व माजी पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाणा यांनी व्यक्त केली.

साळगाव येथे गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सभागृहामध्ये गोवा राज्य जैवविविधता मंडळाने आयोजित कार्यक्रमात चिखली जैवविविधता समिती व रहिवाशांनी तयार केलेल्या जैवविविधता संवर्धन नोंदणी वैधता संबंधी सादरीकरण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

कोणत्याही विकासाला एक मर्यादा असते त्या मर्यादेच्या बाहेर गेल्यास त्याचा पर्यावरणावर परिणाम होतो असे सांगताना साल्ढाणा म्हणाल्या कि गोव्यामध्ये सध्या विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकी प्रसंगी गोवा राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर प्रदीप सरमुकादम यांनी आमदार एलिना साल्ढाणा व इतरांचे स्वागत केले. याप्रसंगी चिखलीच्या पंच मारी मस्कारेन्हास, चिखली जैवविविधता समितीचे अध्यक्ष रुई आरावजो, चिखली चर्चचे फादर बोलमॅक्स परेरा, पर्यावरण प्रेमी सिरीयल फर्नांडिस, पंच रॉबर्ट फाल्काव आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या