Sanguem IIT : सांगेतच ‘आयआयटी’ प्रकल्प होणार : सुभाष फळदेसाई

आयआयटी प्रकल्प हा पूर्णतः शैक्षणिक प्रकल्प
Subhash Phaldesai
Subhash Phaldesai Dainik Gomantak

आयआयटी प्रकल्पाला काणकोण, सत्तरी, सांगे येथे लोकांनी विरोध केल्याने हा प्रकल्प वादग्रस्त ठरत असला तरी सांगे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आयआयटी प्रकल्प सांगेतच होणार असून यासाठी आम्ही जागा सुद्धा पाहिल्या आहेत, असे समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले आहे.

Subhash Phaldesai
‘पर्यटना’साठी अभिनव तंत्राचा वापर : मंत्री खंवटे

आयआयटी प्रकल्प हा पूर्णतः शैक्षणिक प्रकल्प असून ‘आयआयटी’सारखी संस्था सांगे मतदारसंघात आल्यास याचा फायदा राज्यातील युवा पिढीला होणार आहे. काही लोकांनी विरोध केला, हे खरे असले तरी जी जागा आम्ही प्रथम पाहिली होती, ती कमी होती.

त्यासाठी ती जागा नाकारल्याने आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा पाहिली असून हा शैक्षणिक प्रकल्प सांगे मतदारसंघातच होणार असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.

Subhash Phaldesai
तवडकरांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री गडकरींनी करमलघाट रस्त्याच्या पहाणीसाठी धाडले OSD

प्रदूषण विरहित अशा या शैक्षणिक प्रकल्पाला विरोध करणे, हे हास्यास्पद असून काही लोक फक्त विरोधासाठी विरोध करतात, असे फळदेसाई यांनी सांगितले.

सांगे मतदारसंघात बऱ्याच जागा असून त्याठिकाणी हा प्रकल्प साकार होऊ शकतो, आम्ही प्रथम जी जागा दाखवली होती, ती जागा सरकारची होती. त्या जागेला प्रथम प्राधान्य दिले होते, असे त्यांनी सांगितले.

सांगे मतदारसंघातील लोक आपल्याबरोबर असून हा प्रकल्प सांगे मतदारसंघाच्या विकासासाठी वरदान ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com