Subhash Phaldesai: 40 हजार व्यावसायिकांना मिळणार भरपाई

खात्याकडे आलेल्या अर्जांपैकी पुढील पंधरा दिवसांत 40 हजार अर्ज निकालात काढण्यात येतील, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.
Subhash Phaldesai
Subhash Phaldesai Dainik Gomantak

Subhash Phaldesai: राज्यात कोविड काळात लॉकडाऊनमुळे ज्या लघु पारंपरिक व्यावसायिकांना फटका बसला, त्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय यापूर्वीच झाला आहे. यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

या मदतीसाठी खात्याकडे आलेल्या अर्जांपैकी पुढील पंधरा दिवसांत 40 हजार अर्ज निकालात काढण्यात येतील, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

कोविड काळात लॉकडाऊनमुळे राज्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे लहान व्यावसायिक तसेच विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्ये भाजी विक्रेते, खाजेकार, गाडेवाले, चणेकार, यांचा समावेश होता.

अनेक ठिकाणी त्या काळात जत्रा व फेस्तही रद्द केल्याने या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला होता. त्यामुळे राज्य सरकारने या व्यावसायिकांना मदतीचा आधार म्हणून ही प्रत्येकी 5 हजार रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता.

या भरपाईसाठी पात्र असलेल्या अर्जदारांवर अन्याय होणार नाही, असे फळदेसाई यांनी सांगितले. या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील इतर विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

Subhash Phaldesai
Mahadayi Water Dispute: शहांकडून ठोस आश्‍वासन नाहीच !

समाजकल्याण खात्याकडे सुमारे 90 हजार अर्ज आले आहेत. त्यातील 40 हजार अर्ज पहिल्या टप्प्यात निकाली काढण्यात येतील. उर्वरित अर्ज एप्रिलपर्यंत निकालात काढले जातील.

Subhash Phaldesai
Mahdayi River: सुर्ला नाल्याचे पाणी ‘कळसा’तून वळविण्याचा कर‘नाटकी’ डाव!; गोव्यावर गंभीर परिणाम

त्यासाठी अर्थसंकल्पात आणखी किमान 25 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. यापुढे नव्याने अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. ज्यांनी अर्ज केले आहेत, त्यांनाच मदत दिली जाईल, असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com