Subhash Shirodkar: 'चाईल्ड वेल्फेअर’ योजनेचे अनुकरण व्हावे

सुभाष शिरोडकर : दी कपिला सोसायटीच्या नूतन वास्तूचे हरमल येथे उद्‌घाटन
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarGomantak Digital Team

Subhash Shirodkar on Child Welfare Scheme: दी गोवा कपिला सोसायटीची ‘चाईल्ड वेल्फेअर’ ही आदर्श व उत्कृष्ट अशी योजना असून राज्यातील अन्य संस्थांनीही ती मार्गी लावावी.

तशी मी सहकार क्षेत्रात सूचना करणार आहे,असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी केले.

कपिला सोसायटीचे कार्य उत्कृष्ट आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी शैक्षणिक, सामजिक व आर्थिक क्षेत्रात दूरदृष्टी ठेऊन केलेले कार्यही आदर्श आहे,असेही शिरोडकर म्हणाले.

दी गोवा कपिला मल्टीपर्पज सोसायटीच्या नूतन प्रधान वास्तूचा प्रवेश समारंभ व सभासदाच्या गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.

व्यासपीठावर सहकार निबंधक विशांत नाईक-गावणेकर, उपसरपंच दिव्या गडेकर, पंच सुशांत गावडे, अनुपमा मयेकर, संस्थेचे चेअरमन लक्ष्मीकांत पार्सेकर ,संचालक सद्‍गुरु नाईक, भिवा तिळवे, जयंत केरकर, विष्णू परब, विश्राम मोरजकर, व्यवस्थापक संजीव गावकर, माजी संचालक जगन्नाथ पार्सेकर उपस्थित होते.

शिरोडकर म्हणाले की, चाईल्ड वेल्फेअर या योजनेद्वारे दरमहा मुलाच्या नावावर ५६०० रुपये जमा केल्यास दहा वर्षात दहा लाख जमा होतील,या योजनेने मी प्रभावित झालो आहे. राज्यात सुमारे १९० पतसंस्था असून त्याचे भागभांडवल हजारो कोटींचे असेल.

Subhash Shirodkar
Goa Education Policy: विद्यार्थी गळतीच्या निमित्ताने...

त्याचा योग्य वापर व्हावा. निबंधकांनी अशा योजना राबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रारंभी ज्येष्ठ सभासद व ठेविदारांचा तसेच माजी व्यवस्थापक लुईस फर्नांडिस यांचा सत्कार करण्यात आला. संचालक स्मिता पार्सेकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.संचालक अरुण बांधकर यांनी सूत्रसंचालन केले.

संस्थेच्या चार शाखा असून पाचव्या शाखेला परवानगी मिळालेली आहे. सर्व शाखांची कार्यालये ही भाड्याच्या इमारतीत आहेत. सदस्यांच्या प्रयत्नामुळे संस्था स्व मालकीच्या सुसज्ज इमारतीत प्रवेश करत आहे, याचा आनंद आहे. संस्थेने सुरवातीला दोन लाख रुपये कर्ज देण्यास सुरवात केली.आज आम्ही पंधरा लाखांपर्यंत कर्ज देऊ शकतो.

लक्ष्मीकांत पार्सेकर, चेअरमन,दी गोवा कपिला सोसायटी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com