Subhash Shirodkar : ...तर पडिक जमीन सरकार ताब्यात घेणार

जमीन न कसणे, हा गुन्हा
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarDainik Gomantak

पणजी : राज्यातील सुपीक, पण संबंधितांकडून पडिक ठेवलेल्या जमिनी सरकार ताब्यात घेऊ शकते, असा इशारा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला आहे.

मंत्री शिरोडकर म्हणाले, शेतीयोग्य सुपीक जमीन वापराविना पडिक ठेवणे, हा गुन्हा असून शासन अशाप्रकारच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. अशा प्रकारच्या राज्यात 350 हून अधिक ठिकाणच्या जमिनी आढळून आल्या आहेत, ज्या जमिनी अनेक दिवसांपासून लागवडीखाली आणल्या गेलेल्या नाहीत.

Subhash Shirodkar
Goa Illegal Hotels : कारवाईसाठी नोडल अधिकारी नेमा; पर्यटन खात्याची मागणी

जमिनीवर हक्क सांगायचा; पण मशागत करायची नाही, ही चुकीची प्रवृत्ती आहे. खाजन जमिनीतही शेती करावी लागेल. मात्र, यापुढे अशा पडिक जमिनी शासन ताब्यात घेईल आणि त्या लागवडीखाली आणेल. यासाठी आपण जलस्रोत खात्याला तशा सूचना दिल्या आहेत. यासंबंधीच्या माहितीच्या संकलनानंतर सरकार पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असेही शिरोडकर म्हणाले.

जलस्रोत मंत्री शिरोडकर यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात कायदा तयार झाल्यास अनेकांचे धाबे दणाणणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com