गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा: प्रा. सुभाष वेलिंगकर

गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा:  प्रा. सुभाष वेलिंगकर
Subhash Velingkar.jpg

पणजी: गोव्यातील हिंदूंना जिहादी रोहिंग्यांपासून वाचवा, असे आवाहन  भारत माता की जय संघटनेचे संयोजक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.  वेलिंगकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, 3 जून 2021 रोजी, पश्चिम बंगालचे भाजपा नेते, डॉ. अनिर्बान गांगुली यानी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारा गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व भाजपा नेत्यांना, पश्चिम बंगालात रोहिंग्या मुसलनांनी हिंदूविरोधात केलेल्या भीषण हिंसाचाराची आँखोंदेखी माहिती दिली.  (Subhash velingkar said Save Hindus in Goa from Jihadi Rohingyas)

छोट्याशा गोव्यातही सुमारे 85 हजार रोहिंग्या व बांगलादेशी मुसलमान, सर्व पक्षांच्या नेत्यानी गठ्ठा मतांच्या लालसेने या जिहादी घुसखोरांना सुप्रस्थापित केले आहेत. ते सर्व अड्डे भाजपा, काँग्रेस व आपच्या नेत्यांना माहित आहेत. गोव्यात, श्रीपरशुराम गोमंतक सेना, हिंदू जनजागृती व अन्य देशप्रेमी संघटनांनी अनेकदा, लेखी निवेदने मुख्यमंत्र्याना देऊन या घुमसत्या ज्वालामुखीकडे लक्ष वेधले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना हद्दपार करायचे आदेश केंद्र सरकारला दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता वाट न पाहता, मतांचा राजकीय स्वार्थ बाजूला ठेवून या संदर्भात  लोकसुरक्षेसाठी आपले धोरण व कालबद्ध कारवाई तातडीने जाहीर करून आपली इच्छाशक्ती दाखवून द्यावी, अशी मागणी प्रा. वेलिंगकर यांनी केली आहे.

गोव्यातील जनतेला, विशेषतः हिंदू समाजाला, दिल्ली, केरळ, पश्चिम बंगालसारखे हिंसक रोहिंग्या व बांगलादेशी जिहादींच्या अतिरेकाला बळी पडण्यापासून वाचवा, आग लागली की विहीर खणण्याची वृत्ती सोडून त्वरित कारवाई करा, अशी गोव्यातील समग्र हिंदू समाजाची मागणी आहे, असेही प्रा. वेलिंगकर यांनी या पत्रकात नमूद केले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com