''वादग्रस्त पोलीस सागर एकोस्कर यांचा अहवाल सादर करा''

फ्लॉयड कुतीन्हो छळवाद: मानवाधिकार आयोगाची दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना नोटीस
Sagar Ekoskar
Sagar Ekoskar Dainik Gomantak

मडगाव: वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर यांच्या विरोधात मडगाव येथील व्यावसायिक फ्लॉयड कुतीन्हो यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करण्यात पोलीस चाल ढकल करत असल्याचा आरोप कुतीन्हो यांच्याकडून केला गेलेला असतानाच या पोलीस अधिकाऱ्यां संबंधीचा अहवाल 8 जुलै पर्यंत आयोगाला सादर करा अशा आशयाची नोटीस राज्य मानवाधिकार आयोगाने दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अभिषेक धनिया यांच्यावर बजावली आहे. (Submit the report of controversial police officer Sagar Ekoskar; State Human Rights Commission )

Sagar Ekoskar
प्रमोद सावंत सरकारने गोमंतकीयांसमोर मांडला 100 दिवसांचा लेखाजोखा; वाचा सविस्तर

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश उत्कर्ष बाक्रे यांच्या अध्यक्षतेखालील न्या. प्रमोद कामत व न्या. डेसमंड डिकॉस्ता यांच्या त्रिसदस्यीय आयोगाने ही नोटीस जारी केली आहे. दरम्यान आपल्यावर झालेल्या छळाची त्वरित चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना द्यावेत अशी मागणी करणारी एक रिट याचिका कुतीन्हो यांच्यावतीने आज मुंबई न्यायालयात दाखल केली गेली आहे. यांच्यावतीने ऍड. साईश महांब्रे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

Sagar Ekoskar
मागासवर्गींयाना आरक्षण न मिळाल्याची खंत - विजय सरदेसाई

आपल्याकडून 10 लाखांची लाच मागण्यासाठी एकोस्कर हे मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक असताना आपल्या सहकारी पोलिसांच्या मदतीने आपल्यावर खोटी केस तयार करून आपला छळ चालविल्याचा आरोप कुतीन्हो यांनी करून हे प्रकरण मानवाधिकार आयोगाकडे नेले होते.

या याचिकेची दखल घेत आयोगाने पोलीस निरीक्षकांना आपली बाजू मांडण्याची तर पोलीस अधीक्षकांना अहवाल देण्याचा आदेश दिला होता. पोलीस निरीक्षकांनी आपली बाजू मांडली असली तरी दक्षिण गोवा अधीक्षकांनी अजून आपला अहवाल सादर केलेला नाही अशी माहिती आयोगाकडून माहिती मिळाली आहे. वास्तविक हा अहवाल 5 जानेवारीपर्यंत सादर करा असे आयोगाने अधीक्षकांना बजावले होते.

कुतीन्हो यांनी यापूर्वी आपला केला जात असल्याची छळाची तक्रार प्रधानमंत्री कार्यालयातही केली होती, आणि या तक्रारीची दखल घेत गोव्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान या तक्रारीची योग्य तरेने आणि योग्य गतीने चौकशी होत नाही असा दावा करून कुतीन्हो यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून त्यात एकोस्कर यांच्यासह उपनिरीक्षक तेजसकुमार नाईक व पोलीस शिपाई धीरज नाईक व रिझवान शेख यांच्याविरोधात याचिका सादर केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com