जीवनात यशस्वी होऊन शिक्षकांचे नाव मोठे करा: प्रवीण आर्लेकर

मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
प्रवीण आर्लेकर
प्रवीण आर्लेकरDainik Gomantak

मोरजी: शिक्षकांच्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना बरीच बक्षिसे मिळाली. यापुढे त्यांनी शिक्षकांना बक्षीस द्यायला हवे. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होणे, हेच शिक्षकांसाठी सर्वांत मोठे बक्षीस आहे, असे विचार पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी व्यक्त केले.

सरकारी हायस्कूल तोरसे येथे आयोजित वार्षिक बक्षीस वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी पंचसदस्य सूर्यकांत तोरस्कर, सीमा खडपे, तोरसेचे सरपंच उत्तम वीर, मोपाच्या सरपंच सरस्वती नाईक, पर्यावरणप्रेमी विक्रमादित्य पणशीकर, माजी सरपंच मनोहर नाईक, अशोक सावळ, बबन डिसोझा, प्रार्थना मोटे, शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री रेडकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, पालक- शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय महाले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सावळ आदी उपस्थित होते.

प्रवीण आर्लेकर
अन्सुले रस्त्याच्या डांबरीकरण कामास प्रारंभ

हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. साईल कळंगुटकर यांनी सूत्रसंचालन केले. स्वागत व प्रास्ताविक राजश्री रेडकर यानी केले. सुभाष शेटगावकर यांनी परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाचे निवेदन उत्तम परब, समीर शेट मांद्रेकर वअनया तोरस्कर यांनी केले. रमेश परब यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com