राज्यातील सरकारी माध्यमिक शाळेतील यशस्वी प्रयोग

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

खासगी आस्थापने, स्वयंसेवा भांडारे इत्यादी ठिकाणी जाताना सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केलेला आहे. विशेष करून शाळेमध्ये शिक्षकवर्गांना शाळेत प्रवेश करताना, विविध कामे करताना सॅनिटायझरचा वापर करावा लागत आहे, पण हे सॅनिटायझर परत परत वापरण्यात येत असल्याने आरोग्याला सुरक्षित नाही. हा धोका ओळखून सत्तरी तालुक्यातील सावर्डे सरकारी माध्यमिक शाळेत आरोग्यदायी सॅनिटायझर तयार करण्यात आले आहे.

 वाळपई: राज्यात मार्च महिन्यापासून कोविड १९ चा प्रभाव आहे. या कोविडच्या नियंत्रणासाठी सरकार नेहमीच सॅनिटायझरचा वापर करा असे सांगत आले आहे. मार्चपासून सॅनिटायझरला वाढती मागणी आहे.

कोविडच्या भीतीमुळे लोक आता घरी देखील सॅनिटायझर आणून ठेवत आहेत, पण बाजारातील सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. जे आरोग्याला हानीकारक बनले आहे. सरकारी कार्यालयात, खासगी आस्थापने, स्वयंसेवा भांडारे इत्यादी ठिकाणी जाताना सॅनिटायझरचा वापर अनिवार्य केलेला आहे. विशेष करून शाळेमध्ये शिक्षकवर्गांना शाळेत प्रवेश करताना, विविध कामे करताना सॅनिटायझरचा वापर करावा लागत आहे, पण हे सॅनिटायझर परत परत वापरण्यात येत असल्याने आरोग्याला सुरक्षित नाही. हा धोका ओळखून सत्तरी तालुक्यातील सावर्डे सरकारी माध्यमिक शाळेत आरोग्यदायी सॅनिटायझर तयार करण्यात आले आहे.

या शाळेच्या शिक्षकांनी सॅनिटायझर कसे आरोग्याला सुरक्षित राहील या दृष्टीने शाळेतील विज्ञन प्रयोग विभागात गेले काही दिवस प्रयोग सुरू केला होता. सावर्डे शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक व विद्यमान नगरगाव आंबेडे सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक देविदास कोटकर यांनी शिक्षिका तन्वी धुरी, चांदनी गावकर व अन्य शिक्षकांच्या सहकार्याने कोटकर यांनी सावर्डे शाळेत अल्कोहोलचा वापर न करता सॅनिटायझर बनविण्यासाठी कार्य हाती घेतले होते व तो प्रयोग यशस्वी झाला आहे. 

हे नैसर्गिक सॅनिटायझर बनविण्यासाठी कडूनिंब, कापूर, अलोव्हेरा, हळद या चार घटकांचा वापर करून हे नैसर्गिक अल्कोहोल विरहीत सॅनिटायझर तयार केले आहे. हे चारही घटक एकत्र करून प्रयोगशाळेत प्रयोग नळी त्यातील जंतू मरण्यासाठी भांड्यात शंभर डिग्री सेल्सीयस तापमानात उकळण्यात आले व नंतर ते रसायन फिल्टर करण्यात आले आणि नैसर्गिक सॅनिटायर तयार 
झाले.

देविदास कोटकर म्हणाले, बाजारातील विकत घेतलेल्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. असे नेहमीच वारंवार वापरणे हानीकारक आहे. म्हणून आम्ही वेगळा विचार करून चार घटक वापरून सॅनिटायझर तयार केले आहे.

संबंधित बातम्या