डिचोळीत अचानक का वाढली गुळवेल किंवा अमृतवेलची मागणी?

team dainilk gomantak
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

टिनोस्पोरा  कॉर्डीफोलिया  हे बॉटॅनिकल नाव असणाऱ्या या वनस्पतीला भारतात ‘अमृतवेल’ आणि ‘गुळवेल’ या नावाने ओळखले जाते. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. आयुर्वेदात अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या वनस्पतीची अचानक मागणी वाढली आहे.

म्हापसा- गोव्यातील डिचोळी तालुक्यात एक नवीनच लाट आली असून अचानक गुऴवेलच्या काढ्याला येथे जोरदार मागणी वाढली आहे. हा आयुर्वेदिक काढा असून गुळवेलच्या पानांच्या किंवा फांद्यांपासून हा काढा तयार केला जातो.  टिनोस्पोरा  कॉर्डीफोलिया  हे बॉटॅनिकल नाव असणाऱ्या या वनस्पतीला भारतात ‘अमृतवेल’ आणि ‘गुळवेल’ या नावाने ओळखले जाते. प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो.

कोरोनाचा वाढता प्रभाव बघता गोव्यातील नागरिक आता सतर्क होत नवनवीन घरगुती उपाय शोधून काढत प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुऴेच आयुर्वेदात अतिशय महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या या वनस्पतीची अचानक मागणी वाढली आहे. जंगलात अगदी सहज आढणाऱ्या या वनस्पतीची  भाज्यांच्या दुकानांमध्येसुद्धा विक्री होत असून दूरवरून अगदी म्हापशातूनही येऊन लोक ही वेल घेऊन जात असल्याची माहिती काही भाजीविक्रेत्यांनी दिली.

काय आहेत गुळवेलीचे फायदे?

  • गुळवेलीमुळे मधूमेही रुग्णांची रक्तामधील वाढलेली साखर कमी होते. तसेच मधुमेहामध्ये होणारा मज्जादाह(न्यूरायटिस), अंधत्व (ऑप्टिक न्यूरायटिस) इत्यादी उपद्रव टळण्यास मदत होऊन प्रतिकारशक्ती वाढते.
  • गुळवेलीमुळे रक्ताभिसरण सुधारून हृदय बळकट होते.
  • मुरलेल्या जुन्या तापामध्येही गुळवेल फार गुणकारी ठरते.
  •  गुळवेल रक्तातील घटक वाढवण्यास मदत करते.
  •  स्त्री-पुरुषांच्या जननसंस्थेच्या विकारावर गुळवेल फार उपयोगी आहे.
  • गुळवेलीमुळे मानसिक ताणतणावही कमी होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या