Rain In Vasco: अचानक पडलेल्या पावसामुळे वास्कोतील रस्ते निसरडे; तब्बल सहा दुचाकी घसरल्या

आज संध्याकाळी वास्कोत पडलेल्या पावसात सहा दुचाक्या घसरून रस्त्यावर आडव्या पडल्या सुदैवाने चालक किरकोळ जखमावर बचावले.
 वास्कोत पडलेल्या पावसामुळे निसरडा झालेल्या रस्यावर माती शिंपडताना अग्नीशामक दलाचे जवान.
वास्कोत पडलेल्या पावसामुळे निसरडा झालेल्या रस्यावर माती शिंपडताना अग्नीशामक दलाचे जवान.Dainik Gomantak

वास्को: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा निर्माण झाल्याने आज बुधवारी वातावरण ढगाळ राहिले. तसेच मागील दोन दिवस कडाक्याच्या थंडीने लोक गारठले होते. तसेच हवामानात अचानक बदल दिसून आला व पावसाळी वातावरण तयार झाले.

(Sudden rains in Vasco slip around six bikes)

 वास्कोत पडलेल्या पावसामुळे निसरडा झालेल्या रस्यावर माती शिंपडताना अग्नीशामक दलाचे जवान.
Goa Petrol Price: तीन डॉलर्सने स्वस्त कच्चे तेल, तपासा गोव्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दर

काल व आज सकाळपासून संध्याकाळपर्यंन्त दमट आणि ढगाळ वातावरण कायम होते. दरम्यान आज संध्याकाळी वास्कोत 8 वा. अचानक पावसाची रीपरीप सुरू झाली व हवेत गारवा निर्माण झाला.

दरम्यान पडलेल्या पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने वास्कोत एचडीएफसी बॅन्केसमोर सहा दुचाक्या घसरून पडल्या. यात दुचाकी चालक किरकोळ जखमावर निभावले. अचानक पडलेल्या दुचाकी व चालकांना लोकांनी उठवून बाजूला केले.

रस्ता निसरडा झाल्याने नंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी निसरड्या रस्त्यावर माती शिंपडली व वाहन चालकांना कमी वेगात जाण्याचा सल्ला दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com