आसामी युवती बलात्कार प्रकरणातील सुधाकर नाईकचा जामीन मंजूर

सह आरोपी असलेल्या सुधाकर नाईक (Sudhakar Naik) याला आज दक्षिण गोव्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश द्विजपल पाटकर यांनी 30 हजारांच्या जामिनावर मुक्त केले.
आसामी युवती बलात्कार प्रकरणातील सुधाकर नाईकचा जामीन मंजूर
CourtDainik Gomantak

मडगाव: गोव्यात (Goa) नोकरी देण्याच्या वायद्याने एका आसामी युवतीला बोलावून घेऊन नंतर तिला केपे येथील एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवून बलात्कार करण्याचा आरोप असलेला सह आरोपी असलेल्या सुधाकर नाईक याला आज दक्षिण गोव्याच्या (South Goa) अतिरिक्त सत्र न्यायाधीश द्विजपल पाटकर (Dwijpal Patkar) यांनी 30 हजारांच्या जामिनावर मुक्त केले. मात्र या युवतीला दिल्लीहून गोव्यात आणून आपल्या बहिणीच्या मालकीच्या फ्लॅटमध्ये कोंडून ठेवण्याचा आणि बलात्कार करण्याचा आरोप असलेला मुख्य आरोपी शंभूनाथ सिंग हा अजून तुरुंगात आहे. नाईक याच्यावतीने ऍड. अमेय प्रभुदेसाई यांनी बाजू मांडताना, या प्रकरणी पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले आहे. आपला अशील 65 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक असून मागचे चार महिने तो तुरुंगात खितपत पडला आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले.

Court
तीन वर्षांच्या मुलासमोर मजुराने घेतला गळफास

दरम्यान, ही घटना 26 ते 28 जून 2021 या दरम्यान घडली होती. त्या आसामी तरुणीने 100 क्रमांकावरून पोलिसांशी संपर्क साधून आपल्यावर कोंडून ठेवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या घटनेच्या आधीही शंभूनाथ सिंग याने आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने म्हटले होते. या प्रकरणी युक्तिवाद करताना, ऍड. प्रभुदेसाई यांनी, जर या युवतीवर सतत बलात्कार केला गेला असेल तर ती फ्लॅटमध्ये एकटीच असताना तिने पोलिसांशी संपर्क साधून आपली सुटका करून घेतली नाही. तसेच तिला ज्या फ्लॅटमध्ये ठेवले त्या फ्लॅटला गॅलरी असून पीडितेने गॅलरीत येऊन इमारतीतील इतर राहिवासीयांना आपल्या मदतीसाठी का हाक दिली नाही असा सवाल करून त्या दिवशी त्या फ्लॅटमध्ये जे काय झाले ते त्या युवतीच्या संगनमताने झाले असावे व मागाहून आपल्या अशिलाला त्या प्रकरणात गोवले गेले असावे असा दावा केला. न्या. पाटकर यांनी हा युक्तिवाद ग्राह्य मानताना संशयिताला जामीन मंजूर करताना तपास अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय राज्याच्या बाहेर आणि न्यायालयाच्या आदेशाशिवाय देशाच्या बाहेर जाऊ नये अशा अटी घातल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com