पुढील दोन वर्ष गोव्यात कुठल्याच निवडणूका घेऊ नये: सुदीन ढवळीकर

Sudin Dhavalikar has expressed the view that no elections should be held in Goa for the next 2 years.
Sudin Dhavalikar has expressed the view that no elections should be held in Goa for the next 2 years.

राज्यात झालेल्या निवडणुका आणि या निवडणुकांत झालेल्या स्वैराचारामुळेच कोरोना रुग्णसंख्या वाढली असून कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य भयानक लाटेपासून वाचण्यासाठी पुढील दोन वर्षे तरी कोणत्याच प्रकारच्या निवडणुका होऊ नयेत, असे स्पष्ट मत मगो पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी व्यक्त केले आहे. (Sudin Dhavalikar has expressed the view that no elections should be held in Goa for the next 2 years.)

देशात कोरोनाची सध्‍याची भयानक स्थिती ही निवडणुकांमुळेच झाली असून न्यायालयाने ही निवडणुकआयोगाला या निवडणुकीवरून फटकारले आहे. गोव्यातही विधानसभा निवडमउक पुढील वर्षी असून कोरोनाला निमंत्रण देण्यासारखी परिस्थिती येऊ नये यासाठी सर्व निवडणुका पुढे  ढकलून एकतरी राष्ट्र्पती राजवट लावावी किंवा आहे त्यांना मुदतवाढ द्यावी असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

राज्यात कोरोना आणि बळींच्या संख्येत वाढ होण्यास सरकारच जबाबदार असून मुख्यमंत्री व इतर मंत्र्यासमवेत पोलिस वप्रशासकीय यंत्रणा अपयशी ठरली असून लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच योग्य निर्णय व खबरदारी घेण्याची गरज ढवळीकर यांनी व्यक्त केली आहे. कोरोना रुग्णांचे बळी हे ऑक्सिनअभावी जात असून हे सिलिंडर एकतरी अर्धे भरलेले असतात किंवा एका सिलिंडरवर अनेक रुग्‍णांना ठेवले जाते त्यामुळे पुरेसा प्राणवायू मिळत नसल्याने बळींची संख्या वाढत असल्याचे ढवळीकर म्हणाले.

राज्यातील कोविडविरोधी लसीकरण मोहीम ही ग्रामपातळीवर पोचणे आवश्‍यक असून कोविडग्रस्तांची माहिती पंच व सरपंचांना पूर्वीप्रमाणे द्यायला हवी. त्यामुळे  इतरांना खबरदारी घेण्याबरोबरच आवश्‍यक सहकार्यही मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. गोव्याबाहेरून येणारे पर्यटक तसेच ट्रक व इतर वाहनांच्या चालकांची कोविड चाचणी ही करायलाच हवी असेही त्यांनी सांगितले. राज्यात लॉकडाऊन वेळेत केले नाही. मात्र खनिज मालाची वाहतूक जोरात सुरु ठेवली त्यामुळे या लोकांना लोकांच्या जीवाचे काहीच पडलेले नसून मासळी विक्रेते फोंड्यात विक्रीवरून एकमेकांशी भांडतात. हे कशाचे लक्षण आहे असे विचारून आता सरकार नव्हे, लोकांनी स्वतःचे रक्षण करावे, असे सुदिन ढवळीकर यांनी सुचवले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com