गोव्याच्या 10 अपात्र उमेदवार प्रकरणी सभापती काय निर्णय घेणार?

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विधानसभा परिसरात पोहोचले आहेत. "सभापतींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत यावरील निर्णय आज द्यावाच लागेल, व हा निर्णय आमच्या बाजूनेच लागेल", असं ते म्हणाले.

पणजी :  पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत अपात्र ठरण्याआधी प्रतिवादी आमदार राजीनामा देऊ शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही ,असे दुसरे याचिकादार असे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी  विधानसभा संकुलाच्या बाहेर पत्रकारांना सांगितले. ते ही सभापतींसमोरील  सुनावणीसाठी आता उपस्थित झाले आहेत. ढवळीकर यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातून भाजपमध्ये गेलेले मनोहर उर्फ बाबू आजगावकर आणि दीपक प्रभू पाऊसकर या आमदारांविरोधात अपात्रता याचिका सभापती समोर सादर केली आहे.

"गोव्यातील अपात्रता उमेदवारांच्या प्रकरणाचा निर्णय सभापतींना आज घ्यावाच लागेल"

देवळीकर यांनीही या याचिकांवर सुनावणी होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. ढवळीकर यांनी आज सांगितले निर्णय काय होईल यावर मी भाष्य करू इच्छित नाही आता जो काय निर्णय घ्यायचा आहे तो सभापतींनी घ्यायचा आहे. आज निर्णय होईल असेही मी म्हणत नाही. आधी सभापती काय निर्णय घेतात ते पाहू आणि नंतर या विषयावर बोलू असे त्यांनी नमूद केले.

गोव्यात कळंगुटच्या हॉटेलमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

दरम्यान, या याचिकेचे याचिकाकर्ते असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विधानसभा परिसरात पोहोचले आहेत. "सभापतींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत यावरील निर्णय आज द्यावाच लागेल, व हा निर्णय आमच्या बाजूनेच लागेल", असं ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या