गोव्याची अवस्था महाराष्ट्र आणि दिल्ली सारखी करायची का ?

दैनिक गोमंतक
शनिवार, 17 एप्रिल 2021

आवश्‍यक निर्बंध घाला अन्यथा कोरोना प्रकरणे हाताबाहेर जाईल, आणि त्याला जबाबदार सरकारच राहिल, असा इशारा सुदिन ढवळीकर यांनी परिषदेत दिला.

फोंडा: दिल्ली आणि महाराष्ट्रासारखी स्थिती करायची आहे काय, योग्य निर्णय त्वरित घ्या, आवश्‍यक निर्बंध घाला अन्यथा कोरोना प्रकरणे हाताबाहेर जाईल, आणि त्याला जबाबदार सरकारच राहिल, असा इशारा मगो पक्षाचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री व मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. (Sudin Dhavalikar questioned the government about the situation caused by the corona)

कवळे येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत सुदिन ढवळीकर(Sudin DHawalikar) बोलत होते. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक तसेच कवळेचे सरपंच राजेश कवळेकर उपस्थित होते. सुदिन ढवळीकर म्हणाले की, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. पर्यटकांना आव जाव घर तुम्हारा असा प्रकार गोव्याच्याबाबतीत झाल्याने कोरोना प्रकरणे वाढीस लागली असल्याचे ढवळीकर म्हणाले. गोव्यासाठी ही धोक्‍याची घंटा असून आताच योग्य निर्णय घ्या, पर्यटकांना आवरा, त्यांना कोरोना रिपोर्टशिवाय गोव्यात प्रवेश देऊ नका, सभा समारंभ, उत्सव आटोपते घ्या, लोकांच्या जीवाशी खेळू नका अशा सूचना सुदिन ढवळीकर यांनी करून सरकार कोरोनाबाबत गंभीर नाही, आणि होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार राहील, असे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

साखळी महापालिकेवरील भाजपची सत्ता संपुष्ठात; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

कोरोनाचा (Corona) फैलाव रोखण्यासाठी रात्रीचा कर्फ्यू (Night Curfew) लावा, राज्यात कार्यरत सर्व आस्थापनांना आपापल्या कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लस (Corona Vaccine) देण्यासाठी सक्ती करा,  खुद्द मुख्यमंत्री, मंत्री, आमदार वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी मोठ्या गर्दीने जात आहेत, कोणच गंभीर नाही, कोणतेच निर्बंध पाळले जात नाहीत, असेही ढवळीकर म्हणाले. औद्योगिक क्षेत्रासह पर्यटन, हॉटेल, मॉल व इतर अनेक क्षेत्रातील कामगारांना कोविडविरोधी लस देण्यासाठी व्यापक प्रमाणात जागृती आवश्‍यक आहे. सर्वांना लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करा असे सांगताना मागच्या कोविड काळात ज्यांना सरकारी कंत्राटी सेवेत घेण्यात आले, त्यांच्या भवितव्याचा विचार करा आणि त्यांना दिलासा द्या, असे त्यांनी सांगितले. वाढत्या कोरोनाच्या लाटेत विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबतही योग्य निर्णय घ्या असे ढवळीकर म्हणाले. 

 

संबंधित बातम्या