Culture Of Goa : सुलावती आजी म्हणजे ‘कलाविश्‍‍व’च!

नैसर्गिक साधनांना आकार : माडाच्‍या झावळांचे मल्ल विणण्‍यात माहीर; शाळांमधूनही पाचारण
Culture Of Goa
Culture Of GoaDainik Gomantak

पद्माकर केळकर

Culture Of Goa: सत्तरी तालुक्यात नारळ, पोफळी अशा बागायती पिकांचा बहर नेहमीच दिसून येतो. उत्पादनांबरोबरच अशा विविध पिकांच्या वापरानंतर त्यांच्या टाकाऊ घटकांना चांगला आकार दिल्यास त्या नैसर्गिक घटकांना आणखीनच रंगरुपांच्या देखणीय सजावटीसाठी कलाकृती होणे म्हणजे नवलच म्हणावे लागेल.

अशाच माडाच्या झावळांना (चुडतांना) आकर्षक रूप देणाऱ्या पोडोशे-सत्तरी गावच्या ज्‍येष्ठ नागरिक महिला सुलावती गावकर म्हणजे कलाविश्वच म्हणावे लागेल. नारळाच्या झावळांचे मल्ल विणणे हे तर त्‍यांचे आवडीचे काम ठरले आहे.

अगदी उतार वयात देखील सुलावती यांनी आपली कला संवर्धित करून ठेवली आहे. एवढेच नव्हे तर ही कला अन्य लोकांनी, विद्यार्थांनी शिकावी असा त्यांचा अट्टाहास असतो.

म्हणूनच जेव्हा जेव्हा सुलावतींना अशा कला शिकविण्यासाठी हाक देऊन पाचारण केले जाते, त्यावेळी सुलावती गावकर अगदी हिरीरिने सहभाग दर्शवून लोकांना, मुलांना प्रशिक्षणही देतात. विविध शाळांमध्ये पाचारण केले की त्या जातात व अगदी तल्लीन होऊन कलेला दाद देतात.

नारळ माडाच्या झावळांचा वापर करून आकर्षक अशी कलाकृती सुलावती या अगदी सहजपणे करीत आहेत. त्‍या म्हणाल्या लग्न, मुंज, वाढदिवस, वर्धापनदिन तसेच अन्य समारंभावेळी, सणावेळी अशा नैसर्गिक घटकांना आकार, रूप दिल्यास सजावटीतून परिसरही शोभून दिसतो.

लोकांनी ही कला अंगीकारून टाकाऊ नैसर्गिक घटकांनाही बोलके केले पाहिजे. बाजारातून विकत सजावटीसाठी साहित्‍य आणण्‍यापेक्षा आपल्या बागायतीत असलेल्या नारळ, पोफळी व अन्य घटकांना आकार दिल्यास आपला पैसाही वाचेल.

कल्‍पवृक्षाच्‍या प्रत्‍येक भागाचा जीवनात वापर

आपल्या परिसरात असलेल्‍या नैसर्गिक घटकांचा देखील कार्यकुशलतीने वापर केला पाहिजे. आपले विविध सण, उत्सव वर्षभर होतच असतात. त्या सणाला नैसर्गिक सजावट अतिशय शोभून दिसणारी असते.

आपण नारळाच्या झावळांना आकार देण्याचे काम अनेक वर्षांपासून करीत आहे. ज्‍येष्ठ वयात पदार्पण केल तरीही नारळाच्या झावळांचे मल्ल विणणे हे माझे आवडते काम आहे. कधी कुणी शाळेत बोलावले तर तिथे जाते. मुलांनाही शिकविते. माडाला कल्पवृक्ष म्हटले जाते. त्‍याच्‍या प्रत्येक भागाचा वापर जीवनात करता येतो असे सुलावती गावकर म्हणाल्या.

विविध समारंभ, सणावेळी नैसर्गिक घटकांना आकार, रूप दिल्यास सजावटीतून परिसर शोभून दिसतो. लोकांनी ही कला अंगीकारून टाकाऊ नैसर्गिक घटकांना बोलके केले पाहिजे. बाजारातून सजावटीसाठी विकत साहित्‍य आणण्‍यापेक्षा आपल्या बागायतीत असलेल्या नारळ, पोफळी व अन्य घटकांना आकार दिल्यास आपला पैसाही वाचेल.

- सुलावती गावकर, पोडोशे-सत्तरी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com