सनबर्न करणार मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

अवित बगळे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

‘सनबर्न फॉर गोवा’ या उपक्रमासाठी जगातील अव्वल क्रमांकाचा डीजे डीव्हीएलएम जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया ब्रँड फेसबुक आणि अशियातील सर्वांत मोठा संगीत महोत्सव असलेला सनबर्न एकत्र आले आहेत.

पणजी

सनबर्नचे यंदाचे आयोजन हे आभासी पद्धतीने केले जाणार आहे. २९ ऑगस्ट रोजीसनबर्न लाईव्ह प्रक्षेपित केला जाणार आहे. या महोत्सवातून येणारे उत्पन्न ‘कोविड’ विरोधात लढण्यासाठी पर्सेप्ट लाइव्ह ही कंपनी मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करणार आहे.
अशियातील सर्वांत मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स-म्युझिक फेस्टिवल असलेल्या सनबर्न ब्रँडची कंपनी असलेल्या पर्सेप्ट लाइव्हने गोवा राज्यासाठी ‘कोविड’ मदत निधी संकलन करण्याच्या उद्देशाने सनबर्न फॉर गोवा हा व्हर्चुअल संगीत महोत्सव आयोजित करण्याची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी हा महोत्सव लाइव्ह सादर होणार असून यामध्ये जगातील क्रमांक एकचा डीजे डीव्हीएलएम यांच्यासह अनेक नामांकित कलाकार संगीतप्रेमींना मुग्ध करणार आहेत.
‘सनबर्न फॉर गोवा’ या उपक्रमासाठी जगातील अव्वल क्रमांकाचा डीजे डीव्हीएलएम जगातील सर्वांत मोठा सोशल मीडिया ब्रँड फेसबुक आणि अशियातील सर्वांत मोठा संगीत महोत्सव असलेला सनबर्न एकत्र आले आहेत. ‘सनबर्न फॉर गोवा’ उपक्रमामध्ये जगातील क्रमांक एकचा डीजे दीमित्री वेगस अॅण्ड लाइक माइक यांचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. जागतिक स्तरावर ईडीएम क्षेत्रात बेल्जियन डीजे आणि रेकॉर्ड प्रॉडक्शन जोडीने मोहिनी घातली असून त्यांना कँडिस रेडिंग, दीपेश शर्मा, मिस ब्लिस अशा दिग्गज कलाकारांची साथ मिळणार आहे. ‘सनबर्न फॉर गोवा’च्या फेसबुक पेजवर डोनेट बटणच्या माध्यमातून लोकांना या कार्यासाठी थेट मदत करून आपला खारीचा वाटा उचलता येणार आहेच, त्याचबरोबर मनोरंजनाचा सुखद अनुभवही घेता येणार आहे.

संबंधित बातम्या