डिसेंबरमध्ये सनबर्न फेस्टिवलचे आयोजन..!

लाखों संगीत प्रेमींचा महोत्सव म्हणून ओळख..
डिसेंबरमध्ये सनबर्न फेस्टिवलचे आयोजन..!
Sunburn Festival will be held in DecemberFacebook/ @sunburnbeachclub

शिवोली : आशियातील प्रसिद्ध सनबर्न संगीत महोत्सवाची (Sunburn Festival) पर्वणी डिसेंबरात वागातोर पठारावर आशियातील सर्वात मोठा संगीत महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सनबर्न फेस्टिवलचे येत्या 28 ते 30 डिसेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले असून देश विदेशातील लाखों संगीत प्रेमी या महोत्सवाचा आनंद घेत असतात.

Sunburn Festival will be held in December
गोव्यातील हिंदू जनजागृती समिती कॉमेडियन मुनावर फारुकी च्या विरोधात

दरम्यान, कोवीड महामारीच्या पाश्वभुमीवर येथील मागच्या वर्षी सनबर्नचे आयोजन रद्द करण्यात आल्याने लाखों संगीत प्रेमींबरोबरच राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात मिळणारा महसूल चुकला होता. यंदाच्या महोत्सवात जागतीक किर्तीचे संगीतकार बुलझेये, ह्युमन, अर्जुन वागाले, डॉटडेट, त्याचबरोबर डीजे संजय दत्ता तसेच लोकोजेम यांचा समावेश असणार आहे. कोवीड नियमावलीचे पालन करीत मर्यादित संगीत प्रेमींच्या उपस्थितीत यंदाचा महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Sunburn Festival will be held in December
कुंकळ्ळी पालिकेत खडाजंगी

2007 साली गोव्याच्या कांदोळीतून सुरु करण्यात आलेला सनबर्न संगीत महोत्सव 2016 साली आयोजकांकडून पुणे येथे हलविण्यात आला होता . इलेक्ट्रीकल म्युझिक, डान्स तसेच विविध मेजवान्यांसाठी प्रसिद्ध सनबर्न महोत्सव यंदा पुर्ण तयारीनिशी वागातोरच्या पठारावर साजरा करण्यात येणार आहे. येथील महोत्सवात सोलारीस विकेन्ड क्लब येथे सहभागी होण्यासाठी 18 वर्षाहून अधिक वयोमर्यादा असणे आवश्यक असून सनबर्न ग्रुव क्रुझ येथील प्रवेशासाठी वय वर्षे आठ हुन अधिक तसेच सोबत जवळची प्रौढ व्यक्ती असणे आवश्यक आहे. या जागतिक किर्तीच्या महोत्सवात सहभागी होण्यासाठी अंनलाईन बुकींग सुरु करण्यात आले आहे....

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com