यंदा सनबर्न नाही..!

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

सनबर्न पुढील वर्षीही आयोजित करता येईल, पण आजच्या घडीला गोमंतकीयांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे यंदा सनबर्नला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

पणजी : व्यावसायिक, हॉटेल व्‍यावसायिक, शॅक चालक, दुकानदार, रेंट अ बाईक, रेंट अ कार व्यावसायिक अशा सगळ्यांना हा फटका सहन करावा लागला. त्यामुळे पर्यटनाला चालना देण्यासाठी मर्यादित स्वरूपात सनबर्नचे आयोजन करण्यास परवानगी द्यावी, असा विचार पुढे आला होता.

असे असले तरी कोविडची परिस्थिती राज्‍यात सुधारत असली तरी ती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. सनबर्नपेक्षा जनतेचे आरोग्य सरकारसाठी महत्त्‍वाचे आहे. लोकांत सनबर्नच्या आयोजनामुळे कोविड राज्यात पुन्हा पसरेल, अशी भीती निर्माण होऊ नये यासाठी यंदा सनबर्नला परवानगीच न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून ते म्हणाले, लोकांचे आरोग्य, लोकांचे जीवन या साऱ्याच विचार केला. सनबर्न पुढील वर्षीही आयोजित करता येईल, पण आजच्या घडीला गोमंतकीयांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. त्यामुळे यंदा सनबर्नला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातम्या