सुनील अरोरा होणार गोव्याचे नवे राज्यपाल? वाचा सविस्तर

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

गोवा : राज्याच्या राज्यपाल पदावर  देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेचे सदस्यपदावर नियुक्ती केल्यानंतर केंद्र सरकारने माजी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) सुनील अरोरा यांना गोवा राज्यपाल म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

गोवा : राज्याच्या राज्यपाल पदावर  देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माजी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांना राज्यसभेचे सदस्यपदावर नियुक्ती केल्यानंतर केंद्र सरकारने माजी मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) सुनील अरोरा यांना गोवा राज्यपाल म्हणून नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सुनील अरोरा हे राजस्थान कॅडरचे १९८० च्या बॅचचे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत. तर सध्या गोव्याच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त  कार्यभार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे आहे. 65 वर्षांचे सुनील अरोरा हे गेल्या सोमवारीच ते मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाले आहेत. सुनील अरोरा हे मूळचे पंजाबचे आहेत. 

गोव्यात मोरजीच्या मिरचीला सोन्याचा भाव; किंमत ऐकुन व्हाल थक्क ...

कोण आहे सुनील अरोरा?
पंजाबच्या होशियारपुरात 13 एप्रिल 1956 ला सुनील अरोरा यांचा जन्म झाला. सुनील अरोराय यांचे प्राथमिक शिक्षण गावतच  विद्या मंदिर स्कूल आणि दयानंद मॉडेल स्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी होशियारपूरमधूनच  डीएव्ही महाविद्यालयातून पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलं  तर पंजाब विद्यापिठातून एमए केल्यानंतर त्यांची विद्यापीठातच शिकवायला सुरवात केली. सुनील अरोर यांचे वडील रेल्वेविभागात कार्यरत होते. तर आईदेखील डीएव्ही महाविद्यालयात  शिक्षिका होत्या. 

 गोवा : कोरोना रुग्णसंख्येत होणाऱ्या वाढीमुळे फोंडात लोकांमध्ये घबराट

31 ऑगस्ट 2017 रोजी सुनील अरोरा यांची निवडणूक आयुक्त पदावर नियुक्ती झाली होती. राजस्थानमध्ये प्रशासनिक सेवेसह अर्थ आणि वस्त्र मंत्रालय आणि योजना आयोगातही त्यांनी काम केले आहे. त्याचबरोबर प्रसारण खात्यात सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजक मंत्रालयात सचिव म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. तसेच,  सुनील अरोरा 1993 ते 1998 या काळात राजस्थानच्या मुख्यंत्र्यांचे सचिव आणि 2005 ते 2008 मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव या पदावरही कार्यरत होते. केंद्र सरकारने देखील त्यांच्यातील सखोल प्रशासकीय समजामुळे केंद्र सरकारमधील अनेक महत्त्वाची पदे मिळत राहिली. आयएएस नोकरीदरम्यानही त्यांनी राजस्थानच्या धौलपूर, अलवर, नागौर आणि जोधपूर सारख्या जिल्ह्यात काम केले आहे. त्याचबरोबर 5 वर्ष सुनील अरोरा यांनी इंडियन एअर लाइन्सच्या अध्यक्ष आणि मुख्य संचालक पदावरही काम केले आहे. 

संबंधित बातम्या