पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्या कार्यभारात आठवड्याभरातच बदल
Bosco George Dainik Gomantak

पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्या कार्यभारात आठवड्याभरातच बदल

सरकारने (Government) जारी केलेल्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांच्या आदेशात आयपीएस अभिषेक धानिया यांचा समावेश आहे.

पणजी: हल्लीच गोव्यात दाखल झालेल्या आयपीएस पोलिस अधीक्षक बॉस्को जॉर्ज यांच्याकडे देण्यात आलेला सुरक्षा विभागाच्या कार्यभाराला आठवडाही झाला नाही तोच तो काढून त्यांच्याकडे इंडियन रिझर्व्ह बटालियन (IRB) कमांडंटचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे सुरक्षा विभागाचा, एफआऱआरओ व पोलिस नियंत्रण कक्षाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. (Superintendent of Police Bosco George has been posted as Indian Reserve Battalion Commandant)

दरम्यान, सरकारने (Government) जारी केलेल्या पोलिस अधीक्षकांच्या बदल्यांच्या आदेशात आयपीएस अभिषेक धानिया यांचा समावेश आहे. गेले काही महिने दक्षिण गोवा (South Goa) जिल्हा अधीक्षकांचा ताबा त्यांच्याकडे दिला होता त्यावर त्यांची नियमित नियुक्ती करण्यात आली आहे.

Bosco George
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये

उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्याकडे अंमलीपदार्थविरोधी कक्षाचा तर पोलिस (Police) मुख्यालयाचा ताबा असलेले अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्याकडे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com