Goa: कुंडई खूनप्रकरणी पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी घेतला आढावा

Goa: कुंडई खूनप्रकरणी पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी घेतला आढावा
POLICE LINE.jpg

वाडीवाडा: कुंडई येथील खूनप्रकरणाच्या (Murder Case) तपासाचा आढावा घेण्यासाठी आज (शुक्रवारी) दक्षिण गोव्याचे पोलिस (Goa Police) अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी फोंडा (Ponda) पोलिस स्थानकाला भेट दिली. यावेळी पोलिस उपअधीक्षक नेल्सन आल्बुकर्क व पोलिस निरीक्षक मोहन गावडे उपस्थित होते. (Superintendent of Police Pankaj Kumar Singh reviews Kundaim murder case)

पोलिस (Police) अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी तपासकामाचा आढावा घेताना काही सूचना केल्या. वाडीवाडा - कुंडई येथे मोठ्या भावाने छोट्या भावाचा गेल्या मंगळवारी खून केला होता. या खूनप्रकरणात वापरण्यात आलेले हत्यारही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित सागर नाईक पोलिस कोठडीत आहे.

सागर व प्रभाकर या दोन्ही भावांच्या भांडणात प्रभाकर याचा मृत्यू झाला होता. सागरने यापूर्वीही आपल्या मोठ्या भावाचा रत्नाकरचाही खून केला होता. या खुनाबद्दल सागरला सजाही झाली होती.

दरम्यान, पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी घटनास्थळी वाडीवाडा - कुंडई येथे खून झालेल्या घराला भेट देऊन पाहणी केली. या खुनासंबंधी काही महत्त्वाचे तपशीलही अधीक्षकांनी तपासून पाहिले व सूचना केल्या. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com