बांदा सीमेवरील तपासणीचा पोलिस अधीक्षकांकडून आढावा

दैनिक गोमंतक
रविवार, 25 एप्रिल 2021

महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे उभारलेल्या थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाक्‍याला जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी भेट देत आढावा घेतला. राज्य शासनाने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर गोवा राज्य हे प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केले आहे.

महाराष्ट्र-गोवा सीमेवर बांदा-सटमटवाडी येथे उभारलेल्या थर्मल स्क्रिनिंग तपासणी नाक्‍याला जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी भेट देत आढावा घेतला. राज्य शासनाने वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर गोवा राज्य हे प्रवासासाठी संवेदनशील जाहीर केले आहे. त्यामुळे सीमेवर सटमटवाडी येथे पोलिस, महसूल व आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्वांची या ठिकाणी तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक दाभाडे यांनी शुक्रवार (ता.२३) रात्री उशिरा अचानक भेट देत पाहणी केली. या वेळी दिवसभरातील कामाचा त्यांनी आढावा घेतला. तपासणी नाक्‍यावर तैनात असलेल्या पथकाला सूचनाही दिल्या. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी साळुंखे, बांदा पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांच्यासह आरोग्य अधिकारी तेजस्विनी माजगावकर, आरोग्य कर्मचारी प्रसाद डेगवेकर, विलास राऊळ आदी उपस्थित  होते. (Superintendent of Police reviews the investigation at Banda border) 

गोवेकरांनो आपल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी या नंबर वर संपर्क करा

दरम्यान,  गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्यांना आजपासून (ता.२५) ई-पास अत्यावश्‍यक करण्यात आला आहे.  ज्यांच्याकडे प्रवासाचा परवाना नसेल त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. सटमटवाडी तपासणी नाक्‍यावर ई पासची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. चोरवाटांवर लक्ष ठेवण्यासाठी उद्यापासून पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला. जिल्ह्यातून गोव्यात नोकरीसाठी दररोज ये-जा करणाऱ्यांनाही हा नियम लागू केला जाणार आहे. त्यासाठी नोकरदारांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. एकदा चाचणी केल्यानंतर त्याची मुदत १५ दिवस असेल. शासनाच्या या निर्णयामुळे रोज गोव्यात नोकरी, व्यवसायासाठी ये-जा करणाऱ्यांना ई-पास काढणे आवश्‍यक आहे.

संबंधित बातम्या