ओरिसा, कर्नाटकातून गोव्यात अंमली पदार्थांची तस्करी

हा अंमली पदार्थ रेल्वेतून गोव्यात आणला जात असल्याचे स्पष्ट
ओरिसा, कर्नाटकातून गोव्यात अंमली पदार्थांची तस्करी
Supply of drugs from Orissa, Karnataka to GoaDainik Gomantak

मडगाव: गोव्यात (Goa) अंमली पदार्थांचे (Drugs) व्यसन झपाट्याने पसरू लागले असून गोव्यात येणारे अंमली पदार्थ ओरिसा (Orissa) आणि कर्नाटकहून (Karnataka) येत आहे. आणि हा नशीला पदार्थ रेल्वेतून (Railway) गोव्यात आणला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्या वर्षभरात पोलिसांनी (Goa Police) दक्षिण गोव्यात लाखो रुपयांचा अंमली पदार्थांचा माल पकडला आहे.

मागच्या आठवड्यात फातोर्डा पोलिसांनी मडगावच्या बस स्थानकावर एका युवकाला अटक करून त्याच्याकडून 2 लाख रुपयांचा माल जप्त केला होता. पोलिस निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार हा माल ओरिसातून रेल्वेतून गोव्यात आणला होता आणि या युवकाच्या माध्यमातून तो मडगाव परिसरात विकला जाणार होता.

Supply of drugs from Orissa, Karnataka to Goa
गोव्यातील रेव्ह पार्ट्यांत ड्रग्जची माेठी उलाढाल

अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने (Anti-drug cell squad) मागच्या महिन्यात हरमल - पेडणे येथील हरमल पंचक्रोशी हायस्कूलच्या फुटबॉल मैदानाजवळ दिल्लीतील व्हिकी बच्चू यादव (26) या तरुणाला अटक करून त्याच्याकडून सुमारे 3 किलोचा माल जप्त केला होता. त्या गांजाची किंमत सुमारे तीन लाख रुपये असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

Supply of drugs from Orissa, Karnataka to Goa
Mumbai Drug Case: मध्यरात्री NCB ची छापेमारी, एकाला अटक

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पर्यटन सुरू झाले आहे. मोठ्या प्रमाणात पर्यटक गोव्यात येत आहेत. त्यामुळे किनारपट्टी परिसरात पुन्हा अंमलीपदार्थाच्या व्यवसायाने गती घेतली आहे पर्यटकांची वाढती गर्दी बघता आणि अंमलीपदार्थाचा वाढता व्यवसाय बघता गोवा अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने गस्त सुरू केली आहे.

दरम्यान महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने काल पुन्हा वांद्रे, अंधेरी आणि लोखंडवाला येथे धाडी टाकत ड्रग पॅडलरला ताब्यात घेतले. NCB ने मुंबई-गोवा क्रूझवर टाकलेल्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक औषध विक्रेता देखील एनसीबीच्या हाती लागला आहे. काल पासून महाराष्ट्रात NCB पथक अधिकच सक्रिय झाले आहे.

Related Stories

No stories found.