'नवभारताच्या' स्वप्नपूर्तीसाठी भाजपला साथ द्या: जे.पी. नड्डा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील सरकारने राज्यात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे.
'नवभारताच्या' स्वप्नपूर्तीसाठी भाजपला साथ द्या: जे.पी. नड्डा
JP Nadda Dainik Gomantak

डिचोली: केंद्रातील आणि गोव्यातील भाजप सरकार (BJP government) हे 'डबल इंजिन' सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारच्या सहकार्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखालील गोव्यातील सरकारने राज्यात सर्व क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. भाजपच्या सरकारचे कार्य जनतेने अनुभवलेले आहे. कार्यकर्त्यांच्या जोरावरच आगामी निवडणुकीत गोव्यात पुन्हा 'कमळ' उगवून भाजप सत्तेवर येणार आहे. असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (JP Nadda) यांनी डिचोलीत भाजप मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केला. 'गोल्डन गोवा' हे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते. त्यांच्यामागे मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि सभापती राजेश पाटणेकर हे पर्रीकरांनी चेतविलेला 'जोश' पुढे नेत आहेत. असेही नड्डा यांनी सांगून, कार्यकर्त्यांनी त्यांच्यामागे रहावे. असे आवाहन केले.

विरोधकांना केले लक्ष्य

यावेळी बोलताना जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले. 'कोविड' महामारीमुळे देशावर मोठे संकट कोसळले होते. त्यावेळी देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा निर्णय घेतला. लसीकरण सुरु झाले, त्यावेळी हेच विरोधक 'कैसा लगा मोदी का टीका', किंवा भाजप का टीका' अशी धजा उडवत होते. असे जे. पी. नड्डा यांनी सांगून, जनतेने विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. असे आवाहन केले.

JP Nadda
"हाउ इज द जोश" म्हणत जेपी नड्डांनी मनोहर पर्रीकरांच्या आठवणींना दिला उजाळा

येथील हिराबाई झांट्ये स्मृति सभागृहात आयोजित या मेळाव्याप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजपचे गोव्याचे निरीक्षक सी. टी. रवी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, राज्यसभेचे खासदार सय्यद जाफर, डिचोलीचे प्रभारी वासुदेव परब आणि संतोष मळीक, गोवा प्रदेश महिला मोर्चाची सरचिटणीस शिल्पा नाईक, संघटनमंत्री सतीश धोंड,भाजपचे मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी आदी नेतेमंडळी तसेच विविध मोर्चा समित्यांचे प्रमुख, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, आणि डिचोलीचे नगरसेवक उपस्थित होते.

पुढील सरकार भाजपचेच

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या प्रगतीचा आढावा घेतला. गोव्यात पुढील सरकार हे भाजपचेच असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी आतापासूनच तसा निर्धार करून कामाला लागावे. असे आवाहनही त्यांनी केले. राजेश पाटणेकर यांचे मतदारसंघातील कार्य चांगले आहे. असा निर्वाळाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

JP Nadda
'अंतराने काही फरक पडत नाही' म्हणत, अंकिताने सुशांतच्या आठवणींना दिला उजाळा

डिचोली भाजपसाठी अनुकूल

गेल्या निवडणुकीत डिचोली तालुक्यातील तिन्ही मतदारसंघातून भाजपचा झेंडा फडकला होता. डिचोली तालुका भाजपसाठी अनुकूल आहे. यावेळीही कार्यकर्ते तीच किमया करतील. असा विश्वास सदानंद तानावडे यांनी व्यक्त करून डॉ. प्रमोद सावंत हेच पुढील मुख्यमंत्री असतील. अशी ग्वाही दिली. श्रीपाद नाईक यांनी यावेळी बोलताना भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती चालू आहे.असे सांगून राज्यात अवतरलेल्या पक्षांची जनतेने पार्श्वभूमी जाणून घ्यावी. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. असे आवाहन केले. कार्यकर्त्यांची जिद्द आणि तळमळ पाहता, त्यांच्या बळावर पुन्हा डिचोलीत कमळ उगवेल. असा विश्वास राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केला. यावेळी उपस्थितांमधून जल्लोषमय टाळ्यांचा कडकडाट झाला. डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी सूत्रसंचालन केले. वंदे मातरमने मेळाव्याचा समारोप झाला. या मेळाव्यास दोन हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.

जे. पी. नड्डा यांचे स्वागत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि अन्य नेतेमंडळीसह जे. पी. नड्डाजी यांचे मेळाव्याच्या ठिकाणी आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. व्यासपीठावर आसनग्रहण केल्यानंतर डिचोली भाजपतर्फे मोठा पुष्पहार घालून श्री. नड्डा यांचे स्वागत करण्यात आले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com