
Goa BJP पेट्रोलची दरवाढ, गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका, डाळी ,तेलं यांच्या गगनाला भिडलेल्या किमती यामुळे सर्वसामान्यांचं जीवन मेटाकुटीला आलं असताना सरकार मात्र महागाई कमी करण्या संदर्भात सकारात्मक असे काहीच धोरण ठरवताना दिसत नाहीय. उलट नेत्यांकडून सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार केले जात आहेत.
"पेट्रोल, गॅस सिलिंडरची दरवाढ हा आंतरराष्ट्रीय विषय आहे. आंतरराष्ट्रीय दरानुसारच भारतातही दरवाढ होत असते. त्यानुसार गोव्यातही गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे, त्याला काहीही करता येत नाही", असं वक्तव्य करून भाजप नेत्या सुलक्षणा सावंत यांनी दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केलाय.
कोरोना महामारीत अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत, तर अनेकजण गावी परतले आहेत. लॉकडाउनच्या काळातच महागाई वाढत चालली आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टींचेष्टीं चेदर वाढले आहेत.
यामुळे गृहिणींचेणीं चेबजेट कोलमडले आहे. लोकांना घरगुती खर्च भागविणेही कठीण जात आहे. मात्र अशी वक्तव्य करून घरखर्च भागवता भागवता हतबल झालेल्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी करताहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.