'विरोधकांच्या अफवांना बळी न पडता सरकारला आणि भाजपला पाठींबा द्या'

सरकारला आणि भाजपला या व्यावसायिकांनी पाठींबा द्यावा; दयानंद सोपटे
'विरोधकांच्या अफवांना बळी न पडता सरकारला आणि भाजपला पाठींबा द्या'
Dayanand SopteDainik Gomantak

मोरजी : मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी आगरवाडा पंचायत क्षेत्रातील प्रचाराचा श्रीफळ ठेवून शुभारंभ केला. त्यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, तुये माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, आगरवाडा माजी सरपंच खोर्जुवेकर, प्राजक्ता कान्नायिक, एकनाथ चोडणकर, मेधा खोत, गुरुदास नाईक, माजी सरपंच बाबली राऊत, सरपंच भगीरथ गावकर आदी समर्थक उपस्थित होते.

प्रचारा दरम्यान उपस्थितांनी आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांना पाठींबा देवून विजयी करण्याचा निर्धार केला. यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी स्थानिकांकडे बोलताना मागच्या चार निवडणुकीत जसा आगरवाडा पंचायत क्षेत्रातील लोकांनी पाठींबा दिला तसाच पाठींबा या निवडणुकीत द्यावा असे आवाहन करून मतदार संघाच्या विकासाला हात भर लावण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन केले.

Dayanand Sopte
'या' दोन्ही आमदारांवरील सुनावणी 3 फेब्रुवारीला

टॅक्सी व्यावसायिकांनी सरकारला पाठींबा द्यावा

आमदार (MLA) सोपटे यांनी बोलताना टॅक्सी व्यावसायिकांनी विरोधकांच्या अफवांना बळी न पडता सरकारला आणि भाजपला पाठींबा द्यावा. मांद्रे मतदार संघातील (Constituency) आणि पर्यायाने पेडणे तालुक्यातील अनेक टॅक्सी व्यावसायिकांना मोपा विमानतळावर व्यवसाय मिळणार आहे, त्यामुळे पुढील भवितव्य ओळखून सरकारला आणि भाजपला या व्यावसायिकांनी पाठींबा द्यावा असे आवाहन केले.

जनता जो पाठींबा देते त्यावरून आमचा विजय निच्छित आहे, मागच्या महिन्यापासून प्रचार सुरु आहे, जनता मला म्हणते घरोघरी प्रचाराची गरज नाही, आम्हीच प्रचार करतो. पण मी जाणकारांचा आशीर्वाद घेण्यासाठी जातो असे आमदार सोपटे म्हणाले. आगरवाडा माजी सरपंच बाबली राऊत यांनी बोलताना विरोधी पक्षाचे काम हे स्वार्थासाठी असते, त्यांचे सरकार (Government) येणे शक्य नसल्याने केवळ देशाला आणि राज्याला भाजपाशिवाय पर्याय नाही. आमदार दयानंद सोपटे तिसऱ्यांदा या मतदार संघातून विजयी होईल, असा विश्वास व्यक्त केला.

Dayanand Sopte
'या' दोन्ही आमदारांवरील सुनावणी 3 फेब्रुवारीला

माजी सरपंच एकता चोडणकर यांनी बोलताना आगरवाडा गाव हा छोटा गाव असला तरी या गावातूनच सर्वाधिक मते ही आमदार सोपटे यांना मिळवून देणार असे चोडणकर म्हणाले. सरपंच भगीरथ गावकर यांनी बोलताना सोपटे यांना मिळत असलेला पाठींबा त्यावरून राज्यात भाजपची पुन्हा सत्ता येणार आणि त्या सत्येत आमचे आमदार (MLA) मंत्री म्हणून असतील असे ते म्हणाले. एकनाथ चोडणकर यांनी बोलताना मांद्रेत केवळ भाजपच विजयी होईल, आता पर्यंत आमदार दयानंद सोपटे यांनी केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून त्यांना आम्ही संधी देणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com