गोव्यातील बारा आमदार अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने मार्चपर्यंत पुढे ढकलली

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी आज पार पडली. आज या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. 

पणजी : भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या दहा व मगोच्या दोन आमदारांविरोधात आमदार अपात्रतेप्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याचा आदेश गोवा विधानसभा सभापतींना देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सादर केलेल्या अर्जावरील सुनावणी आज पार पडली. आज या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने मार्चपर्यंत पुढे ढकलली आहे. 

गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांना पितृशोक

भाजपमध्ये प्रवेश केलेल्या 10 काँग्रेस व 2 मगो आमदारांविरुद्ध दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी सभापतींनी 26 फेब्रुवारीला ठेवण्यात आली असल्याने सर्वोच्च न्यायालयाने ही सुनावणी मार्चपर्यंत पुढे ढकलली. सभापतींच्या वकिलांकडून या याचिकेवरील निर्णय कळविला जाईल, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आली. यावेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मणिपूरप्रकरणी केलेल्या आमदार अपात्रता याचिकेच्या दिलेल्या निवाड्याचा हवाला देऊन सभापतींनी निर्णय देण्यास उशीर केल्याचे निदर्शनास आणून दिले. सर्वोच्च न्यायालयाने याकडे सभापतींच्या वकिलांचे लक्ष वेधले. त्यामुळे सभापतींना 26  फेब्रुवारीची सुनावणी पुढे ढकलता येणार नाही.

गोव्यात वर्षभरानंतर भरणार ग्रामसभा

राज्याचे सभापती राजेश पाटणेकर यांनी या याचिकांवरील सुनावणी येत्या 26 फेब्रुवारीला घेण्याचे आदेश दिले आहेत. गोव्यातील बारा आमदार अपात्रता प्रकरणी 26 फेब्रुवारीला विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर सुनावणी घेणार आहेत. बारा आमदार अपात्रता प्रकरणी सभापतींनी सुनावणी लवकर घ्यावी यासाठी काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.कोरोना महामारीचे कारण देत गेल्यावर्षी या दोन्ही अपात्रता याचिकांवर सुनावणी घेण्याचे सभापतींनी पुढे ढकलले होते.

 

 

 

 

 

संबंधित बातम्या