सुरेखा काकुले यांचे निधन

Dainik Gomantak
मंगळवार, 12 मे 2020

सुरेखा यांना काल सायंकाळी अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले होते.

पणजी

श्रीमती सुरेखा मोहन काकुले (वय ७२) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता सांतिनेज येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मनोज काकुले आणि उद्योजक सूरज यांच्या त्या आई होत. त्यांच्या मागे मेघना व शेफाली या सूना तर शमिक, मोहित, राजवीर व मानव अशी नातवंडे आहेत. सुरेखा यांना काल सायंकाळी अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना खासगी डॉक्टरकडे नेण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दोनापावल येथील इस्पितळात त्यांना दाखल कऱण्यात आले. सकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मावळली.

संबंधित बातम्या