Goa News: सुर्ल-कुडचडे संतोषी मातेचा मूर्तिप्रतिष्ठापना वर्धापनदिन

सुर्ल-कुडचडे येथील श्री संतोषी माता ट्रस्टच्या परिवार देवतांचा मूर्तिप्रतिष्ठापना प्रथम वर्धापनदिन सोहळा दि. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनुसार साजरा केला जाणार आहे.
Goa News |Samtoshi Mata
Goa News |Samtoshi Mata Dainik Gomantak

Goa News: सुर्ल-कुडचडे येथील श्री संतोषी माता ट्रस्टच्या परिवार देवतांचा मूर्तिप्रतिष्ठापना प्रथम वर्धापनदिन सोहळा दि. 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारीपर्यंत विविध कार्यक्रमांनुसार साजरा केला जाणार आहे.

यानिमित्त उद्या रविवारी पहिल्‍या दिवशी सकाळी देवींची महापूजा, आरती, तीर्थप्रसाद होईल. सोमवार दि. 30 रोजी सकाळी विविध धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, रात्री ८ वाजता युवा स्वराज अँड कल्चरल क्लब वस्तवाडा-कुडचडेतर्फे अखिल गोवा लोकनृत्य स्पर्धा होणार आहे.

त्‍यासाठी पहिले बक्षीस रु.15 हजार, द्वितीय रु. 10 हजार, तृतीय रु. 5 हजार व 15 हजारांची तीन उत्तेजनार्थ बक्षिसे, चषक देण्‍यात येईल. यावेळी प्रमुख पाहुणे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, खास अतिथी समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, माजी खासदार नरेंद्र सावईकर, सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल, नगराध्यक्ष जास्मिन ब्रागांझा, उपनगराध्यक्ष रुचा वस्त, नगरसेवक विश्वास सावंत व जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई उपस्थित राहणार आहेत.

मंगळवार दि. 31 रोजी सकाळी धार्मिक विधी, श्री संतोषी मातेची महापूजा तर रात्री 8 वाजता दीपोत्सव (दिवजा) झाल्‍यानंतर आरत्या, तीर्थप्रसाद होणार आहे. बुधवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी धार्मिक विधी, संध्याकाळी 7 वाजता युवा स्वराज स्‍पोर्टस्‌ क्लबतर्फे अखिल गोवा घुमट आरती स्पर्धा म्‍हणजे घुमट उत्सव होईल.

Goa News |Samtoshi Mata
Goa News: विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करणार -मुख्यमंत्री प्रमोद सावंत

त्‍यासाठी पहिले बक्षीस रु. 10 हजार, दुसरे 7 हजार, तिसरे 3 हजार व चषक तर तीन उत्तेजनार्थ बक्षिसे देण्‍यात येणार आहेत. शिवाय उत्कृष्‍ट घुमटवादक, समेळवादक, कासाळेवादक, गायक यांनाही बक्षिसे दिली जातील.

शनिवार दि. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी धार्मिक विधी, श्री संतोषी मातेची पूजा, महापूर्णहुती, सामूहिक गाऱ्हाणे व दुपारी महानैवेद्य होणार आहे. संध्‍याकाळी 3.20 वाजता देवीची पालखीतून भव्य मिरवणूक श्री पुरुषम्हारू मंदिराकडे जाऊन संगमस्‍नान करून परत मंदिरात येईल.

रात्री 9 वाजता द्वादकलश संप्रोषणविधी, आरती, तीर्थप्रसाद होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्‍येने या कार्यक्रमाला उपस्‍थिती लावावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com