नववर्ष स्वागतानिमित्त गोव्यातून होणाऱ्या दारूची होणार सरप्राईज तपासणी

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 17 डिसेंबर 2020

नववर्ष स्वागतानिमित्त गोव्यातून होणाऱ्या दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सरप्राईज तपासणी नाका उभारण्यात येणार आहे.

सावंतवाडी: नववर्ष स्वागतानिमित्त गोव्यातून होणाऱ्या दारू वाहतुकीवर आळा घालण्यासाठी सरप्राईज तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. तशा सूचनाही पोलिस अधीक्षकांना देण्यात आल्या असून काळ्या काचा असणाऱ्या गाड्यांची विशेष तपासणी केली जाणार असल्याचे कोकण परिक्षेत्र विशेष सिंधुदूर्ग पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी आज येथे सांगितले.
आंबोलीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी तेथे पोलिस ठाणे उभारण्यासाठी निधी उपलब्ध नाही. कोविडच्या पार्श्‍वभूमीवर निधी  उपलब्ध होईल त्याप्रमाणे, पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या वार्षिक तपासणीस श्री. मोहिते आले आहेत. त्यांनी येथील पोलिस ठाण्याची तपासणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपविभागीय अधिकारी रोहिणी सोळंके, निरीक्षक स्वाती यादव, सहायक निरीक्षक शशिकांत खोत आदी उपस्थित होते. श्री. मोहिते म्हणाले, ‘‘गोव्यातून पुणे, नाशिक, सोलापूर आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बनावटीची अवैध दारू वाहतूक होते. ते रोखण्यासाठी यापुढे श्री. दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली सरप्राईज पोलिस तपासणी नाका उभारण्यात येणार आहे. नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अशी दारू वाहतूक रोखणार आहे. तशा सूचनाही दिल्या आहेत. तेथील पोलिस कर्मचाऱ्यांनाही त्यांची ड्यूटी सरप्राईजरित्या समजणार आहेत. दर आठ तासांनी ड्यूटी बदलणार असून अचानकपणे ड्यूटी लावण्यात येणार आहे. गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलिस एकमेकांकडे बोटे दाखवत असले तरी असे गुन्हे रोखणे दोघांनी बंधनकारक आहे. 

‘त्या’ हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाई
खुनी हल्ल्यामध्ये ट्रक चालक मृत्यूप्रकरणी चंदन ऊर्फ सनी अनंत आडेलकर व अक्षय अजय भिके या दोन्ही संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाईची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. त्यातील आडेलकरवर पॉस्को अंतर्गत असलेला गुन्हा व अन्य गुन्हे लक्षात घेता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे श्री. मोहिते यांनी सांगितले.

आणखी वाचा:

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा मुक्तिदिन षष्‍ठ्यब्दीनिमित्त बोधचिन्हाचे अनावरण -

संबंधित बातम्या