सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण: रियाच्या ‘कूपर’ भेटप्रकरणी आयोगाची क्‍लीन चिट

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

मुंबई पोलिस आणि रुग्णालयालाही दिलासा

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीने कूपर रुग्णालयाच्या शवागृहाला भेट दिली होती. या घटनेबाबत आज राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिस आणि कूपर रुग्णालयाला क्‍लीन चिट दिली. कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले नाही, असा निर्वाळा आयोगाने दिला.
सुशांतने १४ जूनला वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी आत्महत्या केली होती. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह कूपरमध्ये नेण्यात आला होता. रियाने भाऊ शौविकसह तेथेच त्याचे अंतिम दर्शन घेतले होते. याचे वार्तांकन प्रसिद्धिमाध्यमातून झाल्यावर विविध प्रकारे टीका झाली होती.

आयोगानेही याची दखल घेतली होती. मुंबई पोलिस आणि रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत खुलासाही मागविण्यात आला होता. रियानेदेखील याबाबत यापूर्वी खुलासा केला होता. याबाबत आज आयोगाचे अध्यक्ष एम. ए. सय्यद यांनी निकाल जाहीर केला. मुंबई पोलिस आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही, असे आयोगाने म्हटले आहे. 
 

संबंधित बातम्या