संशयित वरुण नायरचा जामीन अर्ज फेटाळला काय असावे कारण

प्रतिनिधी
बुधवार, 9 सप्टेंबर 2020

पर्वरी येथील एका तेरा वर्षीय अल्पवयीन विशेष मुलीचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित वरूण नायर (वय ३०) याने बाल न्यायालयासमोर केलेला अर्ज आज नामंजूर करण्यात आला.

पणजी: पर्वरी येथील एका तेरा वर्षीय अल्पवयीन विशेष मुलीचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या संशयित वरूण नायर (वय ३०) याने बाल न्यायालयासमोर केलेला अर्ज आज नामंजूर करण्यात आला. त्याने केलेला गन्हा गंभीर स्वरुपाचा तसेच पोलिस तपासकाम सुरू असल्याने जामीन न देण्याची विनंती सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली होती. 

संशयित वरून नायर याला गेल्या ऑगस्ट महिन्यात २३ रोजी मुलीला निर्जनस्थळी घेऊन जाताना मुलीच्या पालकांनीच त्याला रंगेहात पकडले होते. त्याच्याविरुद्ध दिलेल्या तक्रारीनंतर बलात्कार, बाल कायदा व पोक्सो असे गुन्हे पर्वरी पोलिसांनी दाखल केले होते. 

पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायलायात रवानगी केल्यानंतर त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. संशयिताला जामीन दिल्यास तपासात अडथळे तसेच साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता नाकारता येत नाही. संशयित ही वजनदार व्यक्ती असल्याने तो साक्षीदारांना आमिष दाखवण्याची शक्यता 
आहे. 

संशयित हा पणजीतील अलिशान हॉटेलचा मुलगा आहे. मुलीच्या पालकांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये त्याने मुलीला फूस लावून तिच्यावर यापूर्वीही लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. संशयिताने मुलीला पर्वरी येथे २० ऑगस्टला रात्री एका निर्जनस्थळी भेटावयास बोलावले. मुलगी एकटीच रात्रीची बाहेर गेल्याने पालकांना त्याचा संशय आला त्यामुळे पालकांनी मुलीचा पाठलाग केला. मुलगी ठरलेल्या ठिकाणी तेथे गेली. त्या ठिकाणी संशयित हजर होता. तो तिला घेऊन निर्जनस्थळी जाण्याच्या तयारीत असताना पालकांनी त्याला जाब विचारला. यावेळी तो पळण्याच्या तयारीत असताना पालकांनी त्याला पकडून ठेवले व पर्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
 

संबंधित बातम्या