Goa Crime News: नेसाइत 21 वर्षांच्या तरुणाची हत्या; दुकानात काम करणाऱ्या बिहारी तरुणाला अटक

नेसाइ येथे अर्धवट कुजलेला स्थितीत सापडलेल्या अख्तर रझा वय 21च्या खूनप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी दीकरपाली येथील संशयित आरोपी संदीप गुप्ता, वय 22 वर्षे याला अटक केली आहे .
Goa Crime  News
Goa Crime NewsDainik Gomantak

फातोर्डा: नेसाइ येथे अर्धवट कुजलेला स्थितीत सापडलेल्या अख्तर रझा वय 21च्या खूनप्रकरणी मायणा कुडतरी पोलिसांनी दीकरपाली येथील संशयित आरोपी संदीप गुप्ता, वय 22 वर्षे याला अटक केली आहे. गुन्ह्याच्या घटनास्थळाची सखोल तपासणी केल्यानंतर हत्येचा संशय आला होता आणि अज्ञान व्यक्तीविरुद्ध भा द स 302 कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला होता.

(Goa Crime News)

Goa Crime  News
Goa Politics: गुरू शिष्याचे एकमत 'खरी कुजबुज'

सां जुझे दि एरियल येथील कालव्याच्या ठिकाणी हा मृतदेह दिनांक 17 नोव्हेम्बर रोजी कुजलेल्या स्थितीत हा मृतदेह आढळून आला होता . या ठिकाणाची पोलिसांनी पाहणी केली असता हा प्रकार घातपाताचा असल्याचे त्यांना आढळून आले होते . या प्रकरणाचा उलगढा करण्यासाठी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरविली. आणि 24 तासांच्या आत मूळ बिहार येथील संदीप गुप्ता, वय 22 वर्षे, रा.दीकरपाली याला अटक केली संशयित आरोपी गेल्या 16 वर्षांपासून गोव्यात राहून येथे जनरल स्टोअर चालवतो. आरोपीने मयताच्या ताब्यातील रोकड लुटण्यासाठी मयताच्या डोक्यात वार केले आणि नंतर मयताची ओळख पटवू नये म्हणून दगडाने त्याचे डोके फोडले होते आरोपीच्या सांगण्यावरून खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

Goa Crime  News
Sonsodo Project In Margao: ...म्हणून दिगंबर कामत यांनी भाजप सरकारला दोषी ठरवले

दक्षिण गोवा पोलीस उपअधिक्षक अभिषेक धनिया यांच्या आदेशाखाली एसडीपीओ मडगाव शिवेंदू भूषण यांच्या नेतृत्वाखाली मायणा कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक मोहन गावडे , मडगाव पोलीस स्थंकाचे पोलीस निरीक्षक तुळशीदास नाईक, कोलवा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक फिलोमेना कोस्टा, कुंकळ्ळी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, फातोर्डा पोलीस स्थंकाचे पोलीस निरीक्षक गिरेंद्र जे नाईक , कुडचडे पोलीस स्थंकाचे पोलीस निरीक्षक वैभव नाईक व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा चंदा लावण्यात यश मिळविले . या खुनाची अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com