मुरगावात स्वच्छ अभियानाचे वाजले तीनतेरा

कचरा समस्या ; मुरगावचा राजाच्या सदस्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना धरले धारेवर
मुरगावात स्वच्छ अभियानाचे वाजले तीनतेरा
Honda Panchayat is self sufficient in garbage disposalDainik Gomantak

वास्को : मुरगावात नऊही प्रभागांत स्वच्छ अभियानाचे तीनतेरा वाजले असून, वाढत्या कचरा समस्येची दखल घेऊन हेडलँड सडा-मुरगाव येथील मुरगावचा राजाच्या सदस्यांनी पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन भेटवून धारेवर धरले. याविषयी आपण प्रभागातील नगरसेवक तसेच संबंधित अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर उपाययोजना आखून तोडगा काढू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

Honda Panchayat is self sufficient in garbage disposal
गुंडगिरी पोलिसांना सरकारचा पाठिंबा ; खाणग्रस्त संघटनेचा आरोप

हेडलँड-सडा येथील समाजसेवक शंकर पोळजी तसेच मुरगावचा राजाच्या सदस्यांनी आज वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर नाराजी व्यक्त करून मुरगाव पालिका मुख्याधिकारी जयंत तारी यांना निवेदन भेटवले. त्यांना जाब विचारून धारेवर धरण्यात आले. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत कोट्यवधी रुपये खर्च करून सरकार कचरा समस्येबाबत जनजागृती कार्यक्रम राबवते, याकडे लक्ष वेधण्यात आले.

सुरुवातीला मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन घेण्याचे टाळले. मात्र पालिकेचा संबंधित अधिकारी म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो असून, ती तुमची जबाबदारी नाही, असे म्हणू शकत नाही, असे सांगून ते निवेदन घ्यायला मुख्याधिकाऱ्यांना भाग पाडण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांनी उद्‌भवलेल्या कचरा समस्येविषयी माहिती देऊन हा न्यायप्रविष्ट प्रश्न असल्याचे सांगितले. याविषयी उपाय योजना आखली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

नगरसेवकांनी लोकांमध्ये जागृती करावी

कचरा कायदा 1996 अन्वये कलम 269 आणि 283 अंतर्गत कचरा बेकायदेशीरपणे डंपिंग होतो, यावर लक्ष केंद्रित करून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याची प्रभाग नगरसेवकांनी तसदी घ्यावी. जर एखादी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकताना आढळली तर त्याला एक तर 6 महिने तुरुंगवास किंवा 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात यावी, अशी मागणी मुरगावचा राजाच्या सदस्यांनी केली. कचरा समस्या अधिक बिकट होण्याअगोदर त्याची दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com