गोव्यात 'स्वर-मंगेश' संगीत महोत्सव आजपासून सुरू

'स्वर-मंगेश' संगीत महोत्सवाचे (Music Festival) हे चार दिवस सूर-ताल आणि अभिजात संगीताच्या आविष्काराचा अनुपम आनंद देणारे असतील.
गोव्यात 'स्वर-मंगेश' संगीत महोत्सव आजपासून सुरू
गोव्यात 'स्वर-मंगेश' संगीत महोत्सव आजपासून सुरू Dainik Gomantak

अलीकडच्या काळात गोव्याचा (Goa) एक अत्यंत महत्त्वाचा संगीत महोत्सव (Music Festival) बनलेला ‘स्वर मंगेश - मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती संगीत समारोह’ आजपासून पणजी (Panaji) नजीकच्या कदंब पठारावरील ‘गेरा स्कूल ऑडिटोरियम’मध्ये सुरू होत आहे.

पुणे (Pune) येथील शीतल कोलवाळकर यांच्या कथ्थक नृत्याने या महोत्सवाची सुरुवात होईल. त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत पंडित विजय घाटे. संवादिनीवर असतील अभिषेक शिंकर तर गायनाची साथ असेल सुरंजन खंडाळकर यांची. कथ्थक नृत्याच्या या कार्यक्रमाची संकल्पना आहे विजय घाटे यांची.

गोव्यात 'स्वर-मंगेश' संगीत महोत्सव आजपासून सुरू
बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनं बॉलिवूडही हळहळलं

9, 10, 11 आणि 12 डिसेंबर असे चार दिवस चालणाऱ्या या संगीत समारोहात देशातील अग्रगण्य स्त्री-कलाकार गायन, वादन आणि नृत्याच्य शास्त्रीय अदाकारानी रसिकांना रिझवतील. उपस्थित रसिकांना हिंदुस्थानी शास्त्रीय कलांच्या मेजवानी बरोबरच संगीत साहित्य, वाद्ये, शास्त्रीय ध्वनिमुद्रिका, हस्तकला (Handicraft) आणि गोमंतकीय खाद्यपदार्थ (Goan Food) हे तिथे उभारलेल्या स्टॉलवर उपलब्ध असतील. महोत्सवाचे (Music Festival) हे चार दिवस सूर-ताल आणि अभिजात संगीताच्या आविष्काराचा अनुपम आनंद देणारे असतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com