
श्रावण महिना सुरू झाला की हिंदू संस्कृतीतील सणांची सुरुवात होते. गोव्यामध्ये शिगमोनंतर सर्वात मोठा सण म्हणजे 'गणेश चतुर्थी' अर्थात 'चवथ'. या दरम्यान, गोव्यात चवथ बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे.
20 ऑगस्टपासून सुरू होणार्या स्वयंपूर्ण चवथ बाजारामध्ये मिठाईपासून ते माटोळी, फुले, तसेच हस्तकलेपर्यंतच्या सर्व पारंपारिक वस्तू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे पारंपरिक स्टॉल सर्व तालुक्यात मोफत उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती डॉ. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
(Swayampurna Chavath Bazaar to be held from 20th August)
गणेश चतुर्थीमध्ये मातीच्या बनवलेल्या गणपतीला सजावट अशी अस्सल निसर्गातून वेचून आणलेली असते. हल्ली माटोळी बांधण्याच्या स्पर्धा गोवा सरकारतर्फे भरवल्या जातात. माटोळीतल्या बहुतेक फळे, भाज्या, आणि वनस्पती औषधी गुणधर्माच्या असतात.
चवथ बाजारामध्ये गोव्यातील अस्सल गोष्टींचे प्रदर्शन भरवले जाते जेणेकरून गोव्यातील कलेला प्रोत्साहन मिळते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.