
‘स्वयंपूर्ण गोवा’ हे आपले ध्येय असून त्यासाठी सरकारी यंत्रणा दिवस-रात्र राबत आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
‘प्रशासन तुमच्या दारी’अंतर्गत आज शनिवारी दुसऱ्या दिवशी सुर्ला पंचायत सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, आयएएस अधिकारी श्र्वेतिका सचन, धारबांदोड्याचे उपजिल्हाधिकारी नीलेश धायगोडकर, उपजिल्हाधिकारी, स्थानिक सरपंच, उपसरपंच, पंच, स्वयंपूर्ण मित्र सुबराज काणेकर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
आपले सरकार सदैव जनतेच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत फसव्या अफवांना जनतेने बळी न पडता सरकारच्या मागे खंबीरपणे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येकाने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे.
विरोधक मोठ्या प्रमाणात अपप्रचार करण्यात व्यस्त असल्याने सरकारने केलेली विकास व अन्य लोकपयोगी कामे लोकांपर्यंत पोहोचविण्याची आज गरज निर्माण झाली आहे. असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी साखळी मतदारसंघातील विविध पंचायतींमध्ये उपस्थित राहून जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या.
सुर्ला गावातील शेतकऱ्यांचे कौतुक
सुर्लासारख्या छोट्याशा गावात शंभरपेक्षा अधिक महिलांना कला-कौशल्याचे प्रशिक्षण देऊन काथाकाम, कुणबी साडी विणकाम व्यवसाय सुरू करण्यास मदत करण्यात आलीय. पडीक शेतजमीन ‘स्वयंपूर्ण मिशन’अंतर्गत स्वयंपूर्ण मित्रांच्या सहकार्याने 16 लाख रुपये खर्च करून लावगडीखाली आणण्याची किमया सुर्ला गावातील शेतकऱ्यांनी करून दाखविली. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे विशेष कौतुक केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.