‘स्वयंपूर्णमित्र’ देणार मनुष्यबळ विकासावर भर

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

स्वयंपूर्णमित्र हे गावात मनुष्यबळ विकासावर भर देणार आहेत. ते ग्रामपंचायतींची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी गावात आलेले नाहीत. गाव स्वयंपूर्ण करण्यासाठीच्या संकल्पनेखाली नेमके काय करायचे आहे याचे प्रशिक्षण त्यांना दिले आहे. त्यानुसार ते दर आठवड्याला काम करत जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज राज्यातील सरपंच, पंच, पंचायत सचिवांशी संवाद साधताना नमुद केले.

पणजी :  स्वयंपूर्णमित्र हे गावात मनुष्यबळ विकासावर भर देणार आहेत. ते ग्रामपंचायतींची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी गावात आलेले नाहीत. गाव स्वयंपूर्ण करण्यासाठीच्या संकल्पनेखाली नेमके काय करायचे आहे याचे प्रशिक्षण त्यांना दिले आहे. त्यानुसार ते दर आठवड्याला काम करत जातील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज राज्यातील सरपंच, पंच, पंचायत सचिवांशी संवाद साधताना नमुद केले.

त्यांनी आभासी पद्धतीने या सर्वांशी संवाद साधला. ते म्हणाले, आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा या मोहिमेची सुरवात २ ऑक्टोबरपासून सुरवात केली आहे. स्वयंपूर्ण मित्र पंचायतींना भेट देत आहेत. दर आठवड्यातून तीन तास ते ग्रामपंचायतीत किंवा गावात असतील. मनुष्यबळ विकास करण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार ते कार्यवाही करतील, त्यांना सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक गाव स्वयंपूर्ण झाला तर राज्य स्वयंपूर्ण होण्यास वेळ लागणार नाही. अशी सर्व राज्ये स्वयंपूर्ण झाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारताची निर्मिती होण्यास वेळ लागणार 
नाही.

ते म्हणाले, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारीही ग्रामपंचातींना भेट देणार आहेत. १५ मुद्यांच्या आधारे हे सारे काम करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी शंभर टक्के होते की नाही, रोजगार 

संबंधित बातम्या