स्मार्ट सिटी सीईओ पदावरून स्वयंदीप्ता पाल चौधरींना हटविले

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

आयपीएससीडीएलच्या सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार राज्य कर आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या हेमंत कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे. 

पणजी- इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमीटेडच्या (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून (सीईओ) स्वयंदीप्ता पाल चौधरी यांना आज राज्य सरकारने हटविले आहे. त्याबाबतचा आदेश जारी करण्यात आला आहे.

आयपीएससीडीएलच्या सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार राज्य कर आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या हेमंत कुमार यांच्याकडे देण्यात आला आहे. 

आयपीएससीडीएल कंपनीची स्थापना जुलै २०१६ मध्ये झाल्यापासून सीईओ म्हणून चौधरी काम पाहत होते. परंतु महालेखापरिक्षकांनी या अहवालात स्मार्ट सिटीच्या कामकाजाबाबात संशय व्यक्त केला होता. त्याचबरोबर पणजीतील एका आरटीआय कार्यकर्त्याने चौधरी यांच्याविषयी भ्रष्टाचार विरोधी विभाग तथा दक्षता खात्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीत त्यांच्या गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातील पदावर आणि त्यांना देण्यात येणाऱ्या वेतनाविषयी, तसेच त्यांना वापरास दिलेल्या वाहनांविषयी आक्षेप नोंदविला होता. कार्यकाळाची मुदत संपूनही चौधरी त्यापदावर कार्यरत असण्यावरही बोट ठेवले होते.
 

संबंधित बातम्या