गोवा: कोरोना रुग्णसंख्येने गाठला उच्चांक; परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज

दैनिक गोमंतक
सोमवार, 19 एप्रिल 2021

देशभरात निर्माण झालेल्या संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना आता गोव्यात सुद्धा रुग्णवाढीला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळते आहे.

पणजी: देशभरात निर्माण झालेल्या संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत असताना आता गोव्यात सुद्धा रुग्णवाढीला सुरुवात झाली असल्याचे पाहायला मिळते आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होऊन ही संख्या 883 वर पोचली आहे. तसेच कोविड संसर्ग रुग्णांचे प्रमाण 951 नोंद झाले असून हा उच्चांक आहे. गेल्या आठवडाभरात 35 जणांचा मृत्यू झाला. तसेच 4908 जण कोविड बाधित झाले आहेत. ही संख्या चिंताजनक असली तरी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करून यावर लक्ष ठेवून आहे. कोविड इस्पितळे तसेच कोविड उपचार केंद्रात आवश्‍यक व पुरेशा सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसते आहे. इस्पितळामध्ये जादा खाटांची क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजन व रेमडेसिविरचा साठा प्रत्येक इस्पितळात सज्ज ठेवला आहे. (The system is getting ready at a time when the number of corona patients is increasing in Goa.)

राज्यात वाढणाऱ्या कोविड (Corona) रुग्णांच्या प्रमाणावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) तसेच आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे (Vishwajit Rane) हे लक्ष ठेवून आहेत व ते स्वतः इस्पितळे तसेच उपचार केंद्रामध्ये जाऊन प्रत्यक्षात तयारीची तसेच औषधसाठ्याचा आढावा घेत आहेत. रुग्णांना उपचारामध्ये कोणतीही कमतरता पडू नये. यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. औद्योगिक ऑक्सिजन  निर्यात बंद करून ते सर्व इस्पितळाकडे वळविण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड चाचणी क्षमताही वाढवण्यात आली असल्याने रुग्णांवरील उपचारामध्ये विलंब होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. धार्मिक तसेच मनोरंजन कार्यक्रमांवर निर्बंध लादून हे प्रमाण कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जात आहे. मास्क न वापरणाऱ्यांविरुद्धही कडक पावले उचलण्यात आली असून पोलिस यंत्रणा सक्रिय झाली आहे. अनेक रुग्णांना ‘प्लाझा’ची आवश्‍यकता असल्याने त्यासाठी कोविड महामारीतून बरे झालेल्या दात्यांना ‘प्लाझा’ देण्यासाठी विनंती करूनही पुढे येण्यास नकारात्मक भूमिका घेत असल्याने सरकारसमोर  आव्हान उभे राहिले आहे.  

गेल्या आठवडाभरात दोनवेळा 900 पेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याने सरकारनेही साधनसुविधा उपलब्धेसासाठी ठोस पावले उचलली आहेत. गेल्यावर्षी कोविड काळात 12 जणांचा मृत्यू होण्याची नोंद झाली होती. त्यानंतर आज ११ जणांच्या  मृत्यूची आज नोंद झाली, तरी लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. मृत्यू झालेले रुग्ण 45 ते 81 वयोगटातील असून त्यामध्ये म्हापशातील तिघेजण तर वेर्णा, नावेली, मडगाव, मांगोर हिल, पर्वरी, ताळगाव व सावंतवाडी येथील रुग्णाचा समावेश आहे. आजही दिवसभरात पंचायत पातळीवर तसेच खासगी इस्पितळात मिळून 8107 जणांनी लसीचा डोस घेतला.   

गेल्या चोवीसतासात 3256 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील 951 जण कोविड बाधित सापडले आहेत. आज 105 जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे तर 401 जणांनी गृह अलगीकरणात राहणे स्वीकारले आहे. आज दिवसभरात 531 रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आज 88.1 टक्के आहे. आतापर्यंत 5,92,007 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 67212 जण कोविड बाधितांची नोंद झाली आहे. 

गोव्यात कोरोनाचा कहर: सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता
400 हून अधिक कोरोना रुग्ण काही भागामध्ये सक्रिय आहेत. त्यामध्ये म्हापसा (453), पणजी (444), कांदोळी (440), पर्वरी (615), मडगाव (777), वास्को (451), कुठ्ठाळ्ळी (457) व फोंडा (478) याचा समावेश आहे. सध्या उत्तर गोव्यातील कोविड उपचार केंद्रात 67 तर दक्षिणेत 79 जण दाखल आहेत. कोरोना रुग्णांना इस्पितळात खाटा मिळून उपचार व्हावेत यासाठी उपजिल्हा इस्पितळेही कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करण्याची तयारी सरकारनेठेवली आहे.

 

 

संबंधित बातम्या