Arambol: हरमल येथील अवैध बाजारावर कारवाई करा- ‘पर्यटन’चे पेडणे पोलिसांना पत्र

बेकायदेशीर बाजार चालवणाऱ्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची पर्यटन खात्याची सूचना
Arambol
ArambolDainik Gomantak

हरमल समुद्रकिनाऱ्यावर सायंकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9 वा.पर्यंत बेकायदेशीररीत्या बाजार चालवणाऱ्या विदेशी नागरिक आणि स्थानिक लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची सूचना पर्यटन खात्याने पेडणे पोलिसांना पत्राद्वारे केली आहे. तत्पूर्वी 7 जानेवारी रोजी देखील पर्यटन खात्याने पेडणे पोलिसांना भादंसच्या कलम 188 नुसार बेकायदेशीर बाजार चालवणाऱ्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची सूचना केली होती.

पोलिसांना बाजारात कार्यरत असलेल्या विदेशी नागरिकांसह सर्व व्यक्तींना ताब्यात घेतले पाहिजे. त्यानंतर गुन्हा नोंदवून सक्षम प्राधिकरणासमोर हजर करावे.ज्या लोकांच्या पाठिंब्याने बाजार उभारला गेला, त्या लोकांविरोधात आवश्यक कारवाई सुरू करावी. तसेच पर्यटन खात्याला कारवाईचा अहवाल द्यावा, अशी सूचना पर्यटन खात्याने केली होती.

Arambol
Sunburn Festival : सनबर्न ध्वनी प्रदूषणाचा अहवाल चार आठवड्यात सादर करा - उच्च न्यायालय

पेडणे पोलिसांकडून अद्याप कारवाईचा अहवाल आलेला नसून बाजार बिनबोभाट सुरू असल्याचे सांगितले जात आहे. 13 जानेवारी रोजी अचानक तपासणी दरम्यान, बेकायदेशीर फेरीवाल्यांचा सुगावा लागल्याने बाजार सुरू झाला असल्याची खंत व्यक्त करताना पर्यटन खात्याने दावा केला आहे, की हे सर्व सुसंघटित रॅकेटचा भाग असल्याचे दिसते.

Arambol
Heritage of Goa: गोव्याचा वारसा, निसर्ग जतन करा

गोवा हे कुटुंबासाठी उत्तम पर्यटन स्थळ असल्याचा ओळख कायम ठेवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी पर्यटन उद्योगातील बेकायदेशीर व्यवहार थांबवण्यासाठी पर्यटन खात्याने कारवाईचे सत्र सुरू झाले आहे. गोव्याचा वारसा आणि निसर्गाचे जतन करून पुढील वाटचाल करण्याची आवश्‍यकता आहे. यासाठी राज्यातील समुद्र, नद्या आणि समुद्रकिनारे स्वच्छ ठेवले पाहिजेत, असे मत पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com