पेडण्यातील पूरस्थितीवर आताच उपाय करा

पावसाळ्यात तिळारी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साठते
Take action now on pernem
Take action now on pernemDainik Gomantak

मोरजी: दरवर्षी तिळारी प्रकल्पाचे पाणी भर पावसाळ्यात सोडले जात असल्याने पेडणे तालुक्यात दरवर्षी पुरचा फटका बसून घरांची पडझड होते. त्यामुळे त्यावर आताच पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

पावसाळ्यात तिळारी प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी साठते, त्यामुळे ते पाणी बंधाऱ्याच्या दरवाजातून गोव्याच्या दिशेने सोडले जाते. त्यामुळे दरवर्षी पेडणे तालुक्याला फटका बसतो. तिळारी कालव्यातून तिळारी, सासोली चांदेलमार्गे बैलपार, शापोरा नदीत सोडले जाते. त्यामुळे त्या भागातील गावांना लोकवस्तीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत असतो. दरवर्षी शापोरा आणि काही प्रमाणात तेरेखोल नदीला पूर येत असल्याने ही स्थिती उद्भवत असते.

Take action now on pernem
दोडामार्गातील फुकेरी धरणाचे काम महाराष्ट्राकडून सुरूच...

तिळारी प्रकल्पातून जादा क्षमतेचे पाणी सोडले जाते आणि ते पाणी पेडणेमार्गे येत असल्याने हळर्ण, इब्रामपूर, चांदेल, वझरी, तुये, धारगळ या भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. काही घरांमध्ये पाणी शिरते, रस्ते पाण्याखाली जातात, जनजीवन विस्कळीत होते. हे प्रकार थांबवण्यासाठी आणि त्यावर आताच उपाययोजना करण्यासाठी सरकारने आणि या भागाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

नुकसान कोट्यवधींचे; भरपाई तुटपुंजी!

पावसाळ्यात तिळारीचे पाणी सोडले जात असल्यामुळे तेरेखोल, शापोरा नदीला पूर येऊन या नद्यांच्या दोन्ही बाजूंकडील लोकवस्ती, बागायती शेती पूर्णपणे पाण्याखाली जाते. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. यावेळी मंत्री, आमदार मोठमोठी आश्वासने देतात. मात्र शेतकऱ्यांना तुटपुंजीच नुकसान भरपाई दिली जाते.

Take action now on pernem
जास्तीत जास्त वापर होऊनही यंदा चापोली धरणात अधिक जलसाठा

आमदारांकडून अधिकाऱ्यांना सूचना

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विविध शासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तिळारी प्रकल्पाचे पाणी सोडल्यानंतर पूरग्रस्त स्थिती निर्माण होते, त्यावर कोणत्या उपाययोजना केल्या जातील यावर चर्चा केली आणि पाणी सोडण्यापूर्वी उपाययोजना करावी अशी सूचना अधिकाऱ्यांना केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com